आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शायर हरपला:राहत इंदौरींनी 1993 मध्ये 'सर'साठी लिहिले होते - 'आज हमने दिल का हर किस्सा तमाम कर दिया', अखेरचे 2017 मध्ये 'बेगम जान'मध्ये आले - 'इश्क बडा हरजाई है'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहत इंदौरीं यांना कोरोनाची लागण झाली होती

प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. राहत इंदौरी शेरो-शायरीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतलेखन देखील केले होते.

1992 मध्ये आलेल्या 'जानम' या चित्रपटासाठी राहत साहेबांनी एक गीत लिहिले होते. 'दिल जिगर के जान अच्छा है..', हे त्या गीताचे बोल होते. त्यानंतर त्यांनी 1993 मध्ये 'सर' या चित्रपटातील 'आज हमने दिल का हर किस्सा' हे गीत लिहिले होते. 1994 मध्ये आलेल्या 'नाराज' या चित्रपटातील गाणीही त्यांनी लिहिली होती.

  • टिकटॉकवर व्हायरल झाले होते - बुलाती है मगर जाने का नईं

राहत साहेबांनी लिहिलेली एक रचना टिकटॉक व्हिडिओजमध्येही खूप गाजली होती. त्याचे बोल असे आहेत...

बुलाती है मगर जाने का नहीं ये दुनिया है इधर जाने का नहीं,

मेरे बेटे किसी से इश्क कर मगर हद से गुजर जाने का नहीं

वबा फैली हुई है हर तरफ अभी माहौल मर जाने का नहीं

वो गर्दन नापता है नाप ले मगर जालिम से डर जाने का नहीं

  • राहत साहेबांची शेवटची पोस्ट

रविवारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहत इंदौरी यांनी ट्विट करत सांगितले होते, “कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल.”

  • या चित्रपटांसाठी गाणी लिहिली

एक गीतकार म्हणून राहत इंदौरी यांनी अनेक चित्रपटांसाठी गीत लिहिले. यामध्ये मुन्ना भाई एमबीबीएस, मीनाक्षी, जानम, सर, खुद्दार, नाराज, मर्डर, मिशन कश्मीर, करीब, बेगम जान, घातक, इश्क, आशियां और मैं तेरा आशिक, दरार, गली गली में चोर है, हमेशा, द जेंटजलमेन, पहला सितारा, जुर्म, हनन, इंतेहा, प्रेम अगन, हिमालयपुत्र, पैशन, दिल कितना नादान है, वैपन, बेकाबू, याराना, गुंडाराज, नाजायज, टक्कर, मैं खिलाड़ी तू अनाड़ी आणि तमन्ना, यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

  • अनु मलिकबरोबर हिट जोडी

गीतकार-संगीतकार म्हणून, अनु मलिक यांनी राहत साहेबांच्या गाण्यांना चाली लावल्या. या जोडीने 'नींद चुराई मेरी किसने ओ सनम' आणि 'चोरी चोरी जब नजरें मिलीं, 'पहली शर्त जुदाई है इश्क बड़ा हरजाई है', 'तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है', 'दिल को हजार बार रोका टोका', 'देखले आंखों में आंखें डाल', 'देखो देखो जानम हम दिल अपना', 'कोई जाए तो ले आए' ही गाणी कंपोज केली.

  • राहत साहेबांनी टीव्ही कार्यक्रमातही हजेरी लावली होती

45 वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केले. स्टेज आणि मोठ्या पडद्यासाठी गाणी लिहिल्यानंतर ते छोट्या पडद्यावर 'द कपिल शर्मा' शोमध्येही सहभागी झाले होते. कुमार विश्वास आणि शबीना अदीब यांच्यासोबत ते 2017 मध्ये पहिल्यांदा या शोमध्ये आले होते. जुलै 2019 मध्ये अशोक चक्रधर यांच्यासोबत ते या शोमध्ये दुस-यांदा आले होते. याशिवाय सब टीव्हीच्या 'वाह वाह क्या बात है' या टीव्ही कार्यक्रमात ते पाहुणे म्हणून आले होते.

बातम्या आणखी आहेत...