आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांचे गुरुवारी रात्री दिल्लीत वेडिंग रिसेप्शन पार पडले. या ग्रँड रिसेप्शन पार्टीला राजकारण आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रिसेप्शन पार्टीला हजेरी लावून नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. शिवाय जया बच्चन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली. या पार्टीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो आता समोर आले आहेत.
मेंदी, हळदी समारंभानंतर स्वरा आणि फहाद अहमद यांनी कव्वाली नाईटचे आयोजन केले होते. यावेळी दोघेही ग्रीन कलरच्या आउटफिटमध्ये दिसले.
स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रिसेप्शन पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत.स्वराने रिसेप्शन पार्टीत सुंदर डिझायनर लहेंगा परिधान केला. तर फहाद पारंपरिक लूकमध्ये दिसला.
पाहा स्वराने शेअर केलेले कव्वाली नाइटचे फोटो...
हळद लागली, हातावर मेंदी सजली पण...:स्वरा भास्कर-फहादने लग्न केलेच नाही, स्वराच्या लाल रंगाच्या बनारसी शालूची किंमत आहे एवढी!
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी यावर्षी 6 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी दोघांनी साखरपुडा करत लग्न केल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. कोर्ट मॅरेजनंतर धुमधडाक्यातही लग्न करणार असल्याचे दोघांनी एक व्हिडिओ शेअर करत सांगितले होते. ठरवल्यानुसार नुकताच दोघांचा धुमधडाक्यात त्यांचा मेंदी, हळद आणि संगीत सोहळा पार पडला. मात्र या सर्व समारंभानंतर दोघांनी लग्नच केले नाही, अशी माहिती आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.