आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
1990 मधील म्यूजिकल हिट 'आशिकी'मधून लोकप्रिय झालेला अभिनेता राहुल रॉयला मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. 52 वर्षीय राहुल रॉयला 'कारगिल'मध्ये गलवान व्हॅलीवर बेस्ड चित्रपट 'एलएसी'ची शूटिंगदरम्यान, ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. यानंतर तात्काळ त्यांना श्रीनगरमधील मिलिट्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर, पुढील उपचारासाठी मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये आणले असता, आयसीयूत ठेवण्यात आले आहे.
2 दिवसांपूर्वी तब्येत बिघडली
राहुलसोबत 'एलएसी'ची शूटिंग करत असलेला अभिनेता निशांत सिंह मलकानीने दैनिक भास्करला सांगितले की, "काही दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान राहुल आणि इतर टीम मेंबर्सला समजले की, राहुलला निट बोलता येत नाहीये. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर टीमने त्यांना मिलिट्री हॉस्पिटलमध्ये आणले. तिथे राहुल यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे निदान झाले. येथून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणले."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.