आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल रॉयची कोरोनाची गोष्ट:19 दिवसांपासून क्वारंटाइनमध्ये आहे राहुल रॉय; पण आयसोलेशनमध्ये असूनही कोरोनाची लागण कशी झाली? - राहुलला पडला प्रश्न

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • RTPCR टेस्ट पॉझिटिव्ह, अँटीजन टेस्ट निगेटिव, तिसरा रिपोर्ट आलाच नाही

'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉयला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. स्वतः राहुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मात्र घरात राहून कोरोनाचा संसर्ग कसा झाला, असा प्रश्न त्याला पडला आहे. विशेष म्हणजे राहुलसह त्याची बहीण प्रियांका आणि मेहुण्यादेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लद्दाखमध्ये 'एलओसी' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राहुलला ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यानंतर आता तो हळूहळू यातून बरा होतोय.

राहुलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कोरोनाची लागण कशी झाली याची संपूर्ण कहाणी पोस्टमध्ये सांगितली आहे.

RTPCR टेस्ट पॉझिटिव्ह, अँटीजन टेस्ट निगेटिव, तिसरा रिपोर्ट आलाच नाही
राहुलने लिहिले, 'माझी कोविडची गोष्ट.. माझ्या फ्लोअरवर एका शेजा-याला कोरोनाची लागण झाल्याने 27 मार्च रोजी माझा फ्लोअर सील करण्यात आला. गेल्या 14 दिवसांपासून आम्ही होम क्वारंटाइन आहोत. मला आणि माझ्या कुटूंबाला 11 एप्रिल रोजी दिल्लीला जायचे होते, म्हणून आम्ही 7 एप्रिल रोजी मेट्रोपोलिस लॅबमधून आरटीपीसीआर चाचणी केली. 10 एप्रिल रोजी माझ्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे आम्हाला समजले.'

राहुलने पुढे सांगितले, 'आम्हाला कोणतीही लक्षणे नव्हती, आणि त्याच दिवशी आम्हाला कळले की बीएमसीचे अधिकारी संपूर्ण सोसायटीची कोरोना चाचणी करत आहेत, म्हणून त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्याचे ठरवले. आम्ही अँटीजन चाचणी केली. तर आमच्या सगळ्यांची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली. त्यानंतर पुन्हा आरटीपीसीआरची चाचणी करण्यात आली, ज्याचे नमुने हे उपनगरीय प्रयोगशाळेत देण्यात आले. मात्र, मला अद्यापही चाचणीचा अहवाल मिळालेला नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला आणि माझ्या कुटुंबियांना आयसोलेशन फॉर्मवर सही करण्यास भाग पाडले, माझे घर सॅनिटाइज केले. डॉक्टर काहीही प्रश्न विचारत होते, आमचा कौटुंबिक व्यवसाय काय आहे? माझे ऑफिस कुठे आहे? त्याचा आणि याचा काय संबंध मला माहित नाही. मला रुग्णालयात क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला, तर मी म्हणालो आम्हाला कोणतीही लक्षण नाहीत. तर त्यांनी आम्हाला ऑक्सिजन लेव्हलचा चार्ट बनवायला सांगितला आणि काही औषध घेण्यास सांगितले, ब्रेन स्ट्रोकमुळे मी जेव्हा पासून रुग्णालयातून आलो तेव्हा पासून मी त्याच गोळ्या घेत आहे.'

राहुल पुढे म्हणाला, 'मला माहित आहे की कोरोना अजून आहे. परंतु मी आणि माझ्या कुटुंबीयांना घरातून बाहेर निघाल्या शिवाय, कोणाला न भेटता कोरोनाची लागण कशी झाली? मला याचे उत्तर कधी मिळणार नाही? माझी बहीण प्रियांका ही एक योगिनी आहे. तिने श्वास घेण्याच्या प्राचीन पद्धतींचा अभ्यास केला आहे. ती तर गेल्या तीन महिन्यांपासून घरातून बाहेर पडलेली नाही, तर तिचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह कसा आला? आता आम्हाला पुन्हा एकदा 14 दिवसांचा क्वारंटाइन काळ संपण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे, जेणेकरुन आमची पुन्हा चाचणी होऊ शकेल.'

बातम्या आणखी आहेत...