आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
52 वर्षीय अभिनेता राहुल रॉयची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. त्याचे मेहुणे रोमित यांनी त्याच्या प्रकृतीविषयी माहिती देताना त्याच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होत असल्याचे सांगितले आहे. राहुलला आयसीयूबाहेर आणण्यात आले असून त्याच्यावर स्पीच आणि फिजिओथेरपी करण्यात येत आहे.
10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहणार राहुल
राहुल रॉयला आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे. राहुलची प्रकृती पूर्णपणे सुधारण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याला पुढील 10 दिवस हॉस्पिटमध्ये राहावे लागले. ब्रेन स्ट्रोकमुळे त्याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूवर परिणाम झाला आहे. तसेच एक हातही अशक्त झाला आहे.
शूटिंगदरम्यान आला होता ब्रेन स्ट्रोक
कारगिलमध्ये LAC : Live the Battle चित्रपटाचे शूटिंग करताना राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यावेळी त्याला श्रीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले. 28-29 नोव्हेंबर दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राहुलची प्रकृती गंभीर झाल्याने सुरुवातीला त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. राहुल रॉयला प्रोगेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉयला मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे.
तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत
मागील तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या राहुलने 1990 च्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, या चित्रपटात अनु अग्रवालदेखील मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर राहुल 'जुनून' (1992), 'फिर तेरी कहानी याद आइ' (1993), 'नसीब' (1997), 'एलान' (2011) आणि 'कॅबरे' (2019) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा (2007) विजेताही होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.