आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉस्पिटलमध्ये आहे 'आशिकी'चा नायक:राहुल रॉयच्या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन उचलत आहेत उपचारांचा खर्च, म्हणाले -  जर कुणी मदतीसाठी पुढे आले तर ते माझ्यासाठी सोपे जाईल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुलचा जुळा भाऊ रोहितच्या संपर्कात आहेत नितीन

90 च्या दशकातील गाजलेल्या 'आशिकी' या चित्रपटातील अभिनेता राहुल रॉय सध्या मुंबईच्या नानावती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. कारगिलमध्ये 'एलएसी' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीनकुमार गुप्ता रॉय सध्या राहुलच्या उपचारांचा खर्च उचलत आहे. याचे कारण असे की राहुल स्वत: सध्याचे बँक खाते ऑपरेट करण्यात सक्षम नाही. तथापि, नितीन यांनी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, उपचारांवर जे पैसे खर्च केले जातील ते राहुल ठिक झाल्यानंतर स्वत: परत करेल.

राहुलचा जुळा भाऊ रोहितच्या संपर्कात आहेत नितीन
नितीन यांनी मुंबई मिररला सांगितले, "मी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी आणि राहुलचा जुळा भाऊ रोहित यांच्याशी संपर्कात आहे. रोहित कॅनडामध्ये राहतो. त्यांनी गुरुवारी सकाळी मला सांगितले की राहुलची फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपी नीट सुरु आहे." रोहित राहुलशी अर्धा मिनिटे बोललो. रोहितने सांगितले की राहुल शुद्धीवर असून काही वाक्यही बोलू शकतोय. प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार. दररोज राहुलच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे."

राहुलला स्टंटची आवश्यकता पडू शकते
राहुलच्या उपचारांच्या खर्चाविषयी नितीन म्हणाले, "डॉक्टरांशी माझी चर्चा झाली आहे. भविष्यात मेंदूत होणारे नुकसान टाळण्यासाठी त्याला मिडिल सेरिब्रल आर्टरीमध्ये स्टंटची आवश्यकता पडू शकते. हा महागडा उपचार आहे. कारगिलहून परतल्यानंतर मी डॉक्टरांशी खर्चाबद्दल बोलेल. मी खर्च उचलू शकतो, परंतु जर कोणालाही काही मदत करायची असेल तर ते माझ्यासाठी सोपे जाईल. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की त्यानंतर राहुल हे सर्व पैसे परत करेल."

शूटिंगदरम्यान आला होता ब्रेन स्ट्रोकचा झटका
कारगिलमध्ये LAC : Live the Battle चित्रपटाचे शूटिंग करताना राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकची झटका आला होता. त्यावेळी त्याला श्रीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले. 28-29 नोव्हेंबर दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राहुलची प्रकृती गंभीर झाल्याने सुरुवातीला त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. राहुल रॉयला प्रोगेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉयला मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे.

तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत
मागील तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या राहुलने 1990 च्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, या चित्रपटात अनु अग्रवालदेखील मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर राहुल 'जुनून' (1992), 'फिर तेरी कहानी याद आइ' (1993), 'नसीब' (1997), 'एलान' (2011) आणि 'कॅबरे' (2019) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा (2007) विजेताही होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser