आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल रॉयच्या प्रकृतीत सुधारणा:हॉस्पिटलमधून समोर आला राहुल रॉयचा व्हिडिओ, म्हणाला - मी बरा होतोय, लवकरच परतेल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कारगिलमध्ये LAC : Live the Battle चित्रपटाचे शूटिंग करताना राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकची झटका आला होता.

'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉय सध्या मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. कागरिल चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राहुलला अचानक ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता राहुलच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अलीकडेच रुग्णालयातून राहुलचा एक व्हिडिओ समोर आला आहे यात तो आपल्या बहिणीसोबत दिसतोय. व्हिडिओसह राहुलने लिहिले, मी बरा होतोय. माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल आणि मला भरपूर प्रेम दिल्याबद्दल माझ्या सर्व मित्र, कुटुंबीय आणि चाहत्यांचे खूप खूप आभार. लवकरच मी परतेल.

राहुल रॉयला ICU मधून आता जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांनी आता राहुलला फिजिओथेअरपी देण्यास सुरूवात केली आहे.

शूटिंगदरम्यान आला होता ब्रेन स्ट्रोकचा झटका
राहुल रॉयच्या मेंदूच्या डाव्या भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. कारगिलमध्ये LAC : Live the Battle चित्रपटाचे शूटिंग करताना राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकची झटका आला होता. त्यावेळी त्याला श्रीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले. 28-29 नोव्हेंबर दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राहुलची प्रकृती गंभीर झाल्याने सुरुवातीला त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. राहुल रॉयला प्रोगेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉयला मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे.

तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत
मागील तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या राहुलने 1990 च्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, या चित्रपटात अनु अग्रवालदेखील मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर राहुल 'जुनून' (1992), 'फिर तेरी कहानी याद आइ' (1993), 'नसीब' (1997), 'एलान' (2011) आणि 'कॅबरे' (2019) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा (2007) विजेताही होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser