आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल रॉयचे पुनरागमन:ब्रेन स्ट्रोकनंतर 9 महिन्यांनी कामावर परतला राहुल रॉय, म्युझिक व्हिडिओचे केले शूटिंग; बहीण म्हणाली- 'कामावर परतणे हीच माझ्यासाठी रक्षाबंधनाची सर्वात मोठी भेट आहे'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा म्युझिक व्हिडिओ राहुलचा जवळचा मित्र अझर हुसैन यांनी बनवला आहे.

बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय ब्रेन स्ट्रोकशी झुंज दिल्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनंतर कामावर परतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राहुलचे मेहुणे रोमीर सेन यांनी सांगितले की, राहुलने अलीकडेच एक म्युझिक व्हिडिओ शूट केला आहे. कोणत्याही त्रासाविना त्याने एक संपूर्ण दिवस सेटवर घालवला. हा म्युझिक व्हिडिओ राहुलचा जवळचा मित्र अझर हुसैन यांनी बनवला आहे.

आजारपणात बहिणीने काळजी घेतली
मेहुणे रोमीर यांनी पुढे सांगितले की, राहुलच्या रिकव्हरीमध्ये त्याची बहीण प्रियांकाचा मोठा वाटा आहे. तिने रात्रंदिवस राहुलची सेवा केली. एका मुलाखतीत प्रियांका म्हणाली होती की, तिने जे काही केले ते तिच्या भावासाठी केले, कारण तिचे भावावर खूप प्रेम आहे. प्रियांकाने सांगितले की, राहुलची स्पीच थेरपी आणि म्युझिक थेरपी झाली. त्याने मांसाहार पूर्णपणे सोडून दिला. राहुलला कामावर परतताना बघणे ही रक्षाबंधनाला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे, असे ती म्हणाली.

मेहुणा रोमीर आणि बहीण प्रियांकासोबत राहुल रॉय
मेहुणा रोमीर आणि बहीण प्रियांकासोबत राहुल रॉय

प्रियांका पुढे म्हणाली, 'राहुलला सध्या लांब वाक्ये बोलण्यात अडचण येत आहे, पण थेरपीद्वारे तो यावर लवकरच मात करेल. मी त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहे, त्याचे पल्स रेट सातत्याने तपासत असते. मी त्याला सात्विक अन्न आणि फळे खायला देते जेणेकरून त्याच्या मेंदूची रिकव्हरी जलद होईल.'

कारगिलमध्ये शूटिंगदरम्यान आला होता ब्रेन स्ट्रोक
52 वर्षीय राहुल रॉयच्या मेंदूच्या डाव्या भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. कारगिलमध्ये LAC : Live the Battle चित्रपटाचे शूटिंग करताना राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यावेळी त्याला श्रीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले. मागील वर्षी 28-29 नोव्हेंबर दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राहुलची प्रकृती गंभीर झाल्याने सुरुवातीला त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. राहुल रॉयला प्रोगेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. कारगिलमध्ये त्यावेळी प्रचंड थंडी होती आणि तापमान उणे अंशांमध्ये होते. त्यामुळे राहुल रॉयला मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज वर्तवला गेला होता.

'आशिकी'द्वारे केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण
मागील तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या राहुलने 1990 च्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, या चित्रपटात अनु अग्रवालदेखील मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर राहुल 'जुनून' (1992), 'फिर तेरी कहानी याद आई' (1993), 'नसीब' (1997), 'एलान' (2011) आणि 'कॅबरे' (2019) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा (2007) विजेताही होता.

बातम्या आणखी आहेत...