आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा मृत्यूच्या दाढेतून परतले सेलिब्रिटी:राहुल रॉयपासून ते हेमामालिनी पर्यंत, कुणी अपघातातून थोडक्यात बचावले तर कुणी जीवघेण्या आजारावर केली यशस्वी मात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत, जे मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत.

90 च्या दशकातील गाजलेल्या 'आशिकी' या चित्रपटातील अभिनेता राहुल रॉय सध्या मुंबईच्या नानावती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. 52 वर्षीय राहुल कारगिलमध्ये LAC : Live the Battle चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्याला ब्रेन स्ट्रोकची झटका आला होता. त्यावेळी त्याला श्रीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले. 28-29 नोव्हेंबर दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राहुलची प्रकृती गंभीर झाल्याने सुरुवातीला त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. राहुल रॉयला प्रोगेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉयला मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे.

आता राहुलची प्रकृती धोक्याबाहेर असून तो उपचारांना चांगला प्रतिसाद देतोय. त्याच्यावर स्पीच आणि फिजिओथेरपी सुरु करण्यात आली आहे. लवकरच राहुल बरा होऊन घरी परतेल. राहुलपूर्वी बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत, जे मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. या पॅकेजमधून एक नजर टाकुयात अशा काही सेलिब्रिटींवर....

संजय दत्त

11 ऑगस्ट रोजी संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याने मुंबईत उपचार घेतले. मात्र उपचारादरम्यान त्याने कामापासून ब्रेक घेतला नव्हते. संजयने 7 सप्टेंबर रोजी रणबीर कपूर स्टारर शमशेराच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. ऑक्टोबर महिन्यात संजनये तो कॅन्सर मुक्त झाल्याचे सांगितले.

हेमा मालिनी

2015 मध्ये हेमा मालिनी यांच्या कारला अपघात झाला होता. हा अपघात इतका भयंकर होता की, हेमा यातून थोडक्यात बचावल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या चेह-यावर खूप टाके पडले होते.

जायसा वसीम

दंगल फेम अभिनेत्री जायरा वसीमचा जून 2017 मध्ये कार अपघात झाला होता. जायरा आपल्या काही मित्रांसह जात असताना ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुचला होता. या अपघातात डल लेकमध्ये पडली होती. जवळच्या लोकांच्या मदतीने जायरा आणि तिच्या मित्रांचे प्राण वाचले होते.

अमिताभ बच्चन

26 जुलै 1982मध्ये बिग बी मनमोहन देसाई यांच्या 'कुली' चित्रपटाचे बंगळुरुमध्ये शूटिंग करत होते. बंगळुरु यूनिव्हर्सिटीमध्ये बिग बी आणि पुनीत इस्सर यांना चित्रपटासाठी एक महत्वाचा सीन शूट करायचा होता. यादरम्यान अमिताभ यांना पुनीतचा एक बुक्का इतक्या जोरात लागला, की त्यांच्या आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु झाला. मात्र तरीदेखील ते शूटिंग करत राहिले. त्याच्या पुढील सीनमध्ये बिग बींना टेबलवर उडी मरायची होती, परंतु त्यांनी उडी मारताच टेबलचा एक कोपरा त्यांच्या पोटात लागला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. घटनेनंतर लोकांमध्ये त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यांच्यावब बंगळुरुच्या हॉस्पिटलमध्ये एक शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. येथेही त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तब्बल 63 दिवस त्यांचा जीवन मृत्यूशी संघर्ष सुरु होता. 24 सब्टेंबर 1983 रोजी ते बरे होऊन घरी परतले होते.

हृतिक रोशन

2013 मध्ये बँग-बँग या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हृतिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याने पेन-किलर्स खाऊन शूटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्रास जाणवू लागल्यानंतर त्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करुन डोक्यातील रक्ताची गाठ काढावी लागली होती. यानंतर हृतिक काही आठवडे बेडरेस्टवर होता. प्रकृती ठिक झाल्यानंतर तो शूटवर परतला होता.

मनीषा कोईराला

मनीषा कोईराला 2012 मध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर ती उपचारांसाठी अमेरिकेला गेली होती. तेथे दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर 2015 मध्ये ती कर्करोगमुक्त झाली. 2018 मध्ये तिने 'संजू' या चित्रपटातून कमबॅक केले. या चित्रपटात मनीषाने नर्गिस दत्तची भूमिका साकारली होती.

लिसा रे

2019 मध्ये मल्टीपल मायलोमा (पांढर्‍या रक्त पेशींचा कर्करोग) या आजाराशी लढल्यानंतर लिसा 2010 मध्ये कर्करोगमुक्त झाली होती. या कठीण काळातही लिसाने आपल्या कामापासून ब्रेक घेतला नव्हता. 2011 मध्ये ती ‘ताज’ या नाटकात दिसली होती. 2016 मध्ये तिने 'वीरप्पन'मध्ये काम केले होते. 2019 मध्ये ती 'फोर मोर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजमध्ये झळकली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser