आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द दिशूल वेडिंग:आली समीप लग्न घटिका...  दिशाच्या हातावर सजली मेहंदी, राहुल वैद्य म्हणाला - 'लेने तुझे ओ गोरी आ गये हैं तेरे सजना'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल आणि दिशाने आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर लग्न पत्रिका पोस्ट करून सांगितली होती.

16 जुलै रोजी 'बिग बॉस' फेम गायक राहुल वैद्य अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दोघांच्या लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. बुधवारी मेहंदी सेरेमनीनंतर राहुल आणि दिशा मीडियासमोर आले होते. यानंतर दिशाच्या मेहंदी सोहळ्याचे इनसाइड फोटो आणि व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सर्व नियमांचे पालन करत राहुल-दिशा करणार लग्न
अलीकडेच भास्करसोबतच्या एका खास बातचीतमध्ये राहुल वैद्य म्हणाला होता, "घरी संगीत आणि मेहंदी सेरेमनीची तयारी सुरु झाली आहे. आमचे लग्न हिंदू रीति-रिवाजांनी होणार आहे. लग्नात फार कमी लोक सहभागी होणार आहेत. आम्ही वेगवेगळ्या फंक्शन्ससाठी वेगवेगळ्या लोकांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरुन जास्तीत जास्त लोक उपस्थित राहू शकतील. आम्ही वेगवेगळे हॉल बुक केले आहेत. सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आम्ही लग्न करू."

राहुल आणि दिशाने आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर लग्न पत्रिका पोस्ट करून सांगितली होती.

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र ‘बिग बॉस’ च्या 14 व्या पर्वात राहुलने दिशाला प्रपोज केले होते. यावर दिशाने देखील तिचा होकार दिला होता. राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असे लिहित टेलिव्हिजनवरून दिशाला प्रपोज केले होते. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता.