आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायूट्यूबर आणि अभिनेता राहुल वोहराचे 9 मे रोजी कोरोनाने निधन झाले. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे राहुलचा मृत्यू झाला असा आरोप राहुलची पत्नी ज्योती हिने केला आहे. ज्योतीने राहुलच्या अखेरच्या दिवसांचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले, "प्रत्येक राहुलला न्याय मिळायला हवा. माझा राहुल गेला आहे, हे सर्वांना माहित आहे. पण तो कसा गेला हे कोणालाही माहिती नाही. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ताहिरपूर दिल्ली, इथे अशा प्रकारे उपचार केले जातात..' असा प्रश्न ज्योतीने उपस्थित करत रुग्णालयचा गलथानपणा समोर आणला आहे. सोबतच आशा करते की माझ्या नव-याला न्याय मिळेल. आणखी एक राहुल या जगातून जायला नको, असे ज्योती म्हणाली आहे.
व्हिडिओत राहुल खूप अशक्त दिसतोय
व्हिडिओमध्ये राहुल वोहरा खूप अशक्त दिसत आहे. त्याने ऑक्सिजन मास्क लावलेला दिसतोय. "आजच्या काळात याची किंमत आहे. त्याशिवाय रुग्ण तडफडतो," असे राहुल म्हणतोय. राहुल चेह-यावरचा मास्क बाजुला काढत म्हणतो, "यातून काहीच येत नाहीये," असे सांगितले. हॉस्पिटलमध्ये अटेंडंटला हाक मारल्यानंतर एक ते दीड तास कुणीही जवळ येत नाही. मास्कमधून ऑक्सिजन येत नसल्याचे सांगितल्यावरही कुणी येऊन लक्ष देत नाही, असे राहुलने या व्हिडिओत सांगितले होते.
ज्योतीचा राहुलला भावनिक निरोप
रविवारी रात्री ज्योतीने राहुलसोबतचा फोटो सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केला आणि भावून होऊन, 'प्रेम अधुरे सोडून निघून गेलास' असे लिहिले. आज सर्व भ्रम तुटला आहे, असेही ती म्हणाली आहे.
रविवारी झाले राहुल वोहराचे निधन
द्वारका येथील आयुष्मान रुग्णालयात राहुल वोहराचे रविवारी निधन झाले. दिल्लीतील ताहिरपूर येथील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून आदल्या दिवशीच त्याला येथे हलविण्यात आले होते. राहुलने मृत्युपूर्वी त्याच्या फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने मदत मागितली होती. 'जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचू शकलो असतो, मी लवकरच जन्म घेईल आणि चांगले काम करेल. आता माझ्यातील धैर्य संपले आहे,' अशा आशयाची पोस्ट राहुलने केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.