आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूड:2020च्या दिवाळीला बॉक्स ऑफिसवर पडला नाही पैशाचा पाऊस; 200 ते 300 काेटींचे झाले नुकसान

मुंबई अंकिता तिवारी /अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1986 नंतर ही दुसरी वेळ, यंदा बॉक्स ऑफिसवर पडणार नाही नोटांचा पाऊस

भारतात दरवर्षी दिवाळीला एकापेक्षा एक मोठे चित्रपट रिलीज होत असतात. चित्रपटांनी थिएटर हाऊसफुल असतात. त्यामुळे बाॅक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस पडत असतो. अनेक माेठे तारे फर्स्ट डे साजरा करत असतात. मात्र ही बॉलीवूडच्या इतिहासात १९८६ नंतरचर दुसरी दिवाळी आहे, जेथे बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस पडणार नाही. तज्ज्ञांच्या मते, दिवाळीला चित्रपट रिलीज न झाल्यामुळे बॉक्स आॅफिसला २०० ते ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दिग्दर्शक, निर्मात्यांसह वितरकांचेही नुकसान
- अतुल मोहन (ट्रेड पंडित )

दिवाळीला नेहमी शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचेच चित्रपट रिलीज होत असतात. त्यांचे चित्रपट मेगाबजेटचे चित्रपट असतात. आता यात पहिल्यांदाच मनोज बाजपेयी, फातिमा सना शेख आणि दिलजीत दोसांझ यांचा ‘सूरज पे मंगल भारी’ इव्हेंट म्हणून बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. दरवर्षी दिवाळीला बॉलीवूड चित्रपटाची कमाई २०० ते ३०० कोटीपर्यंत जाते मात्र यंदा कोरोनामुळे काहीच शक्य झाले नाही. यामुळे अभिनेत्यांसोबतच, निर्माते, दिग्दर्शक आणि वितरकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

दिवाळीला सुरू होणारे चित्रपट
यंदा दिवाळीला एकही चित्रपट प्रदर्शित होत नसला तरी मात्र काही चित्रपटांचे शूटिंग सुरू होणार आहे. शाहरुख तब्बल दोन वर्षांनंतर ‘पठाण’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. वरुण धवनही धनतेरसच्या शूटवर बाहेर जाणार आहे. अक्षय कुमार पृथ्वीराजमध्ये व्यग्र असणार आहे. दरम्यान, बरेच मोठे थिएटर हॉलीवूड आणि बॉलीवूडचे जुने चित्रपट रिलीज करतील.

दिवाळीला मोठ्या चित्रपटांची टक्कर होत नाही
राज बंसल (ट्रेड अॅनालिस्ट )

कोरोना आणि सद्य:स्थितीने सिने उद्योगाला अनेक वर्षे मागे सोडले आहे. दिवाळीला दोन तरी चित्रपट रिलीज व्हायचे. चित्रपट चांगले असले तरी दोन्हीला नफा व्हायचा. भारताच्या एकूण कमाईबरोबरच परदेशातील कमाई मिळून बॉक्स ऑफिसवर सुमारे ४०० ते ५०० कोटींचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी दिवाळीत तीन चित्रपट आले. ‘सांड की आंख’, ‘मेड इन चायना’ आणि ‘हाउसफुल ४’ होते. त्यानंतर २०१७ मध्ये ‘सिक्रेट सुपरस्टार’ आणि ‘गोलमाल अगेन’ राहिले. त्याच्या एक वर्ष आधी, ‘शिवाय’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ एकाच तारखेला रिलीज आले होते. दोन्ही चित्रपटांनी १०० कोटींची कमाई केली.आठ वर्षांपूर्वी ‘जब तक है जान’ आणि ‘सन ऑफ सरदार’ यांच्यात सर्वात आव्हानात्मक टक्कर झाली होती. दोन्हीला सारखेच यश मिळाले. २०१० मध्ये अॅक्शन रिप्ले आणि ‘गोलमाल ३’ यांची टक्कर झाली होती. २००९ मध्ये अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीची टक्कर झाली होती. ‘ब्लू’ १०० कोटींच्या घरी गेला होता. मात्र कमाई फक्त ५२ कोटींची झाली होती. सलमानचा ‘मैं और मिसेज खन्ना’देखील या वेळी आला हाेता, मात्र त्यानेही फक्त १० कोटींची कमाई केली होती.

गेल्या २० वर्षांत रिलीज झालेल्या चित्रपटांची कमाई
मोहब्बतें (२०००) ७०.६२ कोटी
वीर जारा (२००४) ६०.६५ कोटी
डॉन (२००६) ५० कोटी
ओम शांति ओम (२००७) १०९.७८कोटी
गोलमाल रिटर्न (२००८) ७०.८९ कोटी
ऑल द बेस्ट (२००९) ५७.०६ कोटी
गोलमाल 3 (२०१०) १४९.१२ कोटी
रा वन (२०११) १५३ कोटी
जब तक है जान (२०१२) १३७.८३ कोटी
कृष (२०१३) २४४ कोटी
हॅपी न्यू इयर (२०१४) २४०.८३ कोटी
प्रेम रतन धन पायो (२०१५) १९४.३ कोटी
ए दिल है मुश्किल (२०१६) १४७.६६ कोटी
गोलमाल अगेन (२०१७) २६४.५ कोटी
ठग्स ऑफ हिंदोस्तान (२०१८) १७६.०० कोटी
हाउसफुल ४ (२०१९) २४७ कोटी

बातम्या आणखी आहेत...