आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कौशल निधन:राज कौशल यांना झाली होती हार्टअटॅक येत असल्याची जाणीव, पत्नी मंदिराला दिली होती कल्पना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज कौशल यांना मंगळवारी संध्याकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते.

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक, निर्माता राज कौशल यांचे बुधवारी पहाटे साडेचार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राज कौशल 49 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंदिरा बेदी, वीर आणि तारा ही दोन मुले आहेत. यापूर्वी रविवारी त्यांनी पत्नी मंदिरासह झहीर खान, सागरिका घाटगे, आशिष चौधरी, समिता बंगारगी, नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्यासोबत एक छोटेखानी पार्टीही केली होती. त्या पार्टीचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त आले आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली.

राज कौशल यांना मंगळवारी संध्याकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते, तसे त्यांनी आपल्या पत्नीला देखील सांगितले होते, असे एका मुलाखतीत संगीतकार सुलेमान मर्चंट यांनी सांगितले. सुलेमान मर्चंट हे राज कौशल यांचे जवळचे मित्र होते.

सुलेमान मर्चंट यांनी मुलाखतीत सांगितले की, 'मंगळवारी संध्याकाळपासूनच राज यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर पित्तावर उपाय म्हणून त्यांनी एक गोळी घेतली होती. मात्र पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागले. राज यांनी पत्नी मंदिराला त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगितले. यानंतर मंदिराने तत्काळ आशिष चौधरीला फोन केला. आशिष आणि मंदिरा राज यांना गाडीतून रुग्णालयात नेत होते. यावेळी गाडीतच राजची प्रकृती अधिक खालावली. त्याला अस्वस्थ वाटू लागले. पुढच्या 5-10 मिनिटांत राजच्या हृदयाचे ठोके थांबल्याचे मंदिराच्या लक्षात आले. कदातिच तेव्हाच त्याने अखेरचा श्वास घेतला होता. जेव्हा ते रुग्णालयात पोहचले तेव्हा डॉक्टरांनी राजला मृत घोषित केले,' असे सुलेमान यांनी सांगितले.

यापूर्वीही आला होता राज कौशल यांना हृदयविकाराच झटका
सुलेमान मर्चंट यांनी सांगितल्यानुसार, राज कौशल 30-32 वर्षांचे असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. याविषयी त्यांनी सांगितले, 'राज त्यावेळी 30-32 वर्षांचे होते. पण त्या झटक्यानंतर त्यांनी स्वतःची खूप काळजी घेतली होती आणि तेव्हापासून राज ठीक होते.' सुलेमान मर्चंट आणि राज गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. राज कौशल यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला चित्रपट 'प्यार में कभी कभी'ला सलीम-सुलेमान यांनी संगीत दिले होते.

अभिनेता म्हणून केली होती करिअरची सुरुवात
राज यांनी अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी आपल्या कारकीर्दीत 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मंदिरा आणि राज यांचे 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या वर्षी राज आणि मंदिरा यांनी मुलगी ताराला दत्तक घेतले होते. मंदिरा आणि राज यांची पहिली भेट 1996 मध्ये मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा तेथे ऑडिशनसाठी गेली होती आणि राज हे मुकुल आनंदचे सहाय्यक म्हणून काम करत होते. येथूनच दोघांचे प्रेम सुरू झाले.

बातम्या आणखी आहेत...