आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोर्नोग्राफी प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तब्बल दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याला 20 सप्टेंबर रोजी जामिन मंजुर झाला. याकाळात राजने अनेकदा जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु विविध कारणांमुळे न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली होती. पण यावेळी त्याचा जामिन न्यायालयाने मंजुर केला. राज कुंद्राला जामिन मिळाल्यानंतर त्याचा मुलगा विआनने सोशल मीडिया अकाउंटवरुन एक खास पोस्ट शेअर केली आहे.
विआनने त्याची आई शिल्पा आणि धाकटी बहीण समिशासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत विआनने लिहिले, 'आयुष्य हे गणपती बाप्पाच्या सोंडेप्रमाणे आहे... आयुष्यात येणारी संकटे ही त्याचे वाहन असलेल्या उंदरा प्रमाणे छोटी आहेत. प्रत्येक क्षण हा त्यांच्या मोदकाप्रमाणे गोड आहे... गणपती बाप्पा मोरया...'
शिल्पा शेट्टीची पोस्टही आहे चर्चेत
पतीचा जामिन मंजूर झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. शिल्पा शेट्टीने पोस्ट शेअर करताना लिहिले, ‘एका मोठ्या वादळानंतरच सुंदर इंद्रधनुष्य दिसते. हे इंद्रधनुष्य वादळानंतरदेखील अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे सांगते.’ या पोस्टसह शिल्पाने इंद्रधनुष्य असलेला फोटो शेअर केला आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने काही काळासाठी सोशल मीडियावर ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती सोशल मीडियावर परतली आणि सातत्याने सकारात्मक पोस्ट ती शेअर करतेय. शिल्पा अलीकडेच वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली होती. तेथील तिचे काही फोटोज आणि व्हिडिओदेखील सोशल मीडियावर समोर आले होते.
पोर्नोग्राफी प्रकरणात मागील 19 जुलैपासून तुरुंगात असलेल्या राज कुंद्राला 20 सप्टेंबर रोजी मोठा दिलासा मिळाला. मुंबईतील मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर राज कुंद्राला जामिन मंजूर केला. दरम्यान जामिन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, राज कुंद्रा स्थानिक पोलिस ठाण्याला कळवल्याशिवाय शहर सोडू शकत नाही. तुरुंगातून बाहेर पडतानाची राजची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात त्याच्या डोळ्यात पाणी आणि चेह-यावर निराशा दिसतेय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.