आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेर्न फिल्म रॅकेट:राज कुंद्रा 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत, शिल्पा शेट्टीच्याही चौकशीची शक्यता; आणखी बडी नावेही समोर येऊ शकतात

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेर्न फिल्म निर्मिती व त्या ॲपवर अपलाेड केल्याच्या प्रकरणात अटकेतील व्यावसायिक राज कुंद्राला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राजला मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री उशिरा अटक केली होती. सूत्रांनुसार, या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येऊ शकतात.

याप्रकरणी पत्नी शिल्पा शेट्टीचीही चौकशी होऊ शकते. शिल्पा बहुतांश व्यवसायांत राज कुंद्राची भागीदार आहे. पोलिसांनी काेर्टाला सांगितले की, ‘कुंद्रा पाेर्न फिल्म रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा मोबाइल जप्त केला असून आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होईल.’ प्रकरणात आजवर ११ जणांना अटक झाली आहे.

परदेशात स्थापली होती कंपनी: वृत्तांनुसार, कुंद्राने पोर्न फिल्म उद्योगात ८-१० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्याने ब्रिटनमध्ये राहत असलेल्या भावासोबत केनरिन नावाची कंपनी स्थापली. भारताच्या सायबर लाॅपासून वाचण्यासाठी कंपनीची परदेशात नोंदणी केली. पाेर्न फिल्म्सचे व्हिडिओ भारतात शूट केले आणि वुई ट्रान्स्फरच्या माध्यमातून ते केनरिनला पाठवण्यात आले.

अनेक तरुणी जाळ्यात : गुन्हे शाखेने मुंबईच्या एका अज्ञात व्यक्ती व परदेशातील पोर्न माफियातील फोनवरील संवाद इंटरसेप्ट केला. काही तरुणांचे जबाबही घेण्यात आले आहेत. आपण आंतरराष्ट्रीय पोर्नोग्राफी टोळीच्या जाळ्यात अडकल्याची कबुली तरुणांनी दिली. दरम्यान या प्रकरणात कुंद्राचे ८-१० वर्षे जुने व्हाॅट्सअॅप चॅट लीक झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...