आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा नाही:न्यायालयाने 27 जुलैपर्यंत वाढवली राज कुंद्राची पोलिस कोठडी, पॉर्न चित्रपटांच्या व्यवसायातून आलेल्या पैशांचा वापर ऑनलाइन सट्टेबाजीसाठी होत असल्याचा पोलिसांना संशय

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाने 27 जुलैपर्यंत त्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे.

पाेर्न चित्रपटांची निर्मिती आणि ते ॲपवर अपलाेड केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला व्यावसायिक आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. कुंद्राला आज (23 जुलै) मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. कोर्टाने 27 जुलैपर्यंत त्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. राज कुंद्रासह त्याचा सहकारी रेयान थार्प यांच्याही पोलिस कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ झाली आहे.

आज कुंद्राला कोर्टात हजर केल्यानंतर मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे अधिक वेळ मागितला होता. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण खूप मोठे आहे, ते केवळ अश्लील चित्रपटांपुरते मर्यादित नाही. आरोपी हे संघटित पद्धतीने चालवत होते. पॉर्न चित्रपटांच्या व्यवसायातून आलेल्या पैशांचा वापर ऑनलाइन सट्टेबाजीसाठी होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळेच राज कुंद्राचे येस बँक खाते आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिका खात्यामधील व्यवहार तपासले गेले पाहिजेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. तो रात्री 9 वाजता मुंबई गुन्हे शाखेच्या भायखळा कार्यालयात पोहोचला होता. सुमारे दोन तासांच्या चौकशीनंतर रात्री अकरा वाजता त्याला अटक करण्यात आली होती. 20 जुलै रोजी त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हा कोर्टाने 23 जुलैपर्यंत त्याला कोठडी सुनावली होती. आता त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

या प्रकरणात कुंद्रासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. कुंद्राच्या मेहुण्यासह अन्य काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

शिल्पा शेट्टीला दिलासा

राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या बहुतेक व्यवसायात भागीदार असल्याने शिल्पा शेट्टीला पोलिस चौकशीसाठी बोलावू शकतात, अशी शक्यता वर्तवली गेली होती. मात्र मुंबई पोलिस शिल्पा शेट्टीला चौकशीसाठी समन्स बजावणार नसल्याचे मुंबई पोलिसांच्या एका सूत्राने न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, अभिनेत्री शिल्पा शेट्टी वियान इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे. मुंबई पोलिस सध्या केनरीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा तपास करत आहेत. 'केनरिन' ही यूकेस्थित कंपनी असून हॉटशॉट्स अ‍ॅप याच कंपनीचे आहे. पॉर्न व्हिडिओंच्या वितरणाचे काम राज कुंद्रा केनरिन या कंपनीच्या माध्यमातून करत असे.

बातम्या आणखी आहेत...