आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Raj Kundra Porn APP Hotshots Case From The Shooting Method To The Camera Angle, Kundra's Team Reviews The Actresses' Profiles Before Selecting Them

राज कुंद्राचा 'डर्टी ईमेल':शूटिंगच्या पद्धतीपासून ते कॅमेरा अँगलपर्यंत, अभिनेत्रींची निवड करण्यापूर्वी त्यांच्या प्रोफाइलचा आढावा घेत असे कुंद्राची टीम

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कॅमेरा अँगल पासून ते लाइव्ह स्ट्रीमिंगपर्यंतचा तपशील

पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि ते ॲपवर अपलाेड केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला व्यावसायिक आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. कुंद्राला आज (23 जुलै) मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. कोर्टाने 27 जुलैपर्यंत त्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. राज कुंद्रासह त्याचा सहकारी रेयान थार्प यांच्याही पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. दरम्यान, कुंद्राचा ईमेल लीक झाला आहे, ज्यामध्ये कुंद्राच्या ‘डर्टी’ चित्रपटाच्या निर्मितीचे संपूर्ण नियम व कलमांबद्दल लिहिले गेले आहे. राज कुंद्राच्या अश्लील चित्रपटांच्या या धंद्याच्या प्रोजेक्टला 'ख्वाब' असे नाव देण्यात आले होते.

आज कुंद्राला कोर्टात हजर केल्यानंतर मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे अधिक वेळ मागितला होता. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण खूप मोठे आहे, ते केवळ अश्लील चित्रपटांपुरते मर्यादित नाही. आरोपी हे संघटित पद्धतीने चालवत होते. पॉर्न चित्रपटांच्या व्यवसायातून आलेल्या पैशांचा वापर ऑनलाइन सट्टेबाजीसाठी होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळेच राज कुंद्राचे येस बँक खाते आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिका खात्यामधील व्यवहार तपासले गेले पाहिजेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. तो रात्री 9 वाजता मुंबई गुन्हे शाखेच्या भायखळा कार्यालयात पोहोचला होता. सुमारे दोन तासांच्या चौकशीनंतर रात्री अकरा वाजता त्याला अटक करण्यात आली होती. 20 जुलै रोजी त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हा कोर्टाने 23 जुलैपर्यंत त्याला कोठडी सुनावली होती. आता त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

या प्रकरणात कुंद्रासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. कुंद्राच्या मेहुण्यासह अन्य काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

कॅमेरा अँगल पासून ते लाइव्ह स्ट्रीमिंगपर्यंतचा तपशील

हॉटशॉटच्या कंटेंट हेडच्या वतीने 14 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 5:25 वाजता पारस रंधावा आणि ज्योती ठाकूर नावाच्या दोन लोकांना ईमेल पाठवण्यात आला होता. यामध्ये ‘ख्वाब’ या प्रोजेक्टची सविस्तर माहिती देण्यात आली होती. चित्रीकरण कसे होईल? कॅमेरा कोणत्या अँगलने असेल, अभिनेत्रीचे प्रोफाइल काय असायला हवे, लाइव्ह स्ट्रिमिंग करणा-या कलाकाराला जास्तीत जास्त कसे दाखवायचे, याबद्दलचे तपशीलदेखील होते. ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्राइबर वाढवण्यासाठीचा उपायदेखील यात सांगण्यात आला होता.

चित्रपटांसाठी ही मार्गदर्शक सूचना तयार केली गेली होती

 • फायनल मुव्ही MP 4 स्वरूपात, 900 MB पेक्षा कमी आणि 1920X1080 आकारात असेल.
 • पोर्ट्रेट पोस्टर 510X766 साइजमध्ये 900 MB पेक्षा कमी असेल.
 • सोशल मीडियासाठी स्वतंत्र बोल्ड पोस्टर्स असतील आणि काही सामान्य पोस्टर्सदेखील असतील.
 • लँडस्केप पोस्टर्स देखील स्वतंत्रपणे राहतील.
 • सोशल मीडियासाठी 15 सेकंदाचा सामान्य टीझर असेल.
 • 60 ते 90 सेकंदांचा बोल्ड ट्रेलर असेल, जो अ‍ॅपवर अपलोड केला जाईल.
 • सोशल मीडियासाठी 60 ते 90 सेकंदाचा नॉन बोल्ड ट्रेलर देखील असेल.
 • 2 ते 3 मिनिटांचा नॉन बोल्ड व्हिडिओ स्वतंत्रपणे ठेवला जाईल.
 • एका व्हिडिओसाठी 3 लाख रुपये मिळतील

या ईमेलमध्ये मानधनाचा उल्लेख देखील आहे. जर हा व्हिडिओ हॉटशॉटच्या डिजिटल टीमला त्यांच्या अॅपसाठी अनुकुल वाटला तर तो खरेदी केला जाईल. त्या बदल्यात 3 लाख रुपये दिले जातील. ईमेलच्या पुढच्या भागात सांगितले गेले की, शूटिंगपूर्वी फिमेल लीडचे संपूर्ण प्रोफाइल हॉटशॉट टीमला पाठवावे लागेल. हॉटशॉटच्या टीमच्या मंजुरीनंतरच आपण शूट करावे. कलाकाराची सोशल मीडियावर स्ट्राँग प्रेझेंट असणे ही यातील एक अट होती. इतकेच नाही तर अभिनेत्रीने स्वेच्छेने बोल्ड सीन (समोररुन टॉपलेस आणि फुल बॅक न्यूड) करण्यास तयार असायला हवे, असेही या ईमेलमध्ये सांगण्यात आले होते.

व्हिडिओ खरेदी केल्यानंतर व्हिडिओचे सर्व अधिकार हॉटशॉट डिजिटलकडे राहतील. जर व्हिडिओ सीनिअर टीमला आवडत नाही तर तो तुम्ही इतरत्र विकण्यास मोकळे आहात, असा उल्लेखदेखील या ईमेलमध्ये होता.

बातम्या आणखी आहेत...