आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफी प्रकरण:राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिल्यांदाच समोर आले शिल्पा शेट्टीचे विधान, म्हणाली - आमचे मीडिया ट्रायल व्हायला नको, मी आता गप्प आहे, पुढेदेखील काहीही बोलणार नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता शिल्पाने एक पोस्ट शेअर केली आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला 19 जुलै रोजी अटक झाली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणावर अद्याप शिल्पाने आपली बाजू मांडली नव्हती. पण आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या सगळ्यांचा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम होतोय, हे सांगितले आहे. सोबतच खोटी बातमी प्रकाशित करु नये, असेही ती म्हणाली आहे. सोशल मीडियावर शिल्पाने दोन पानांची पोस्ट शेअर केली आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पावरही अनेक प्रकारचे आरोप लावले जात आहेत आणि तिच्याबद्दल अनेक अफवाही पसरत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. याविषयी शिल्पा म्हणाली, माझे नाव घेऊन कोणतीही चुकीची विधाने पसरवू नका.

मला आणि माझ्या कुटुंबाला ट्रोल केले जात आहे
शिल्पाने आपल्या दोन पानांच्या पोस्टमध्ये लिहिले, 'होय, गेल्या काही दिवस माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी अतिशय आव्हानात्मक आहेत. आमच्यावर अनेक आरोप केले जात आहेत, अफवा पसरवल्या जात आहेत. मीडियाने आणि माझ्या 'हितचिंतकांनी' माझ्याबद्दल अनेक अनावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. केवळ मीच नाही तर माझ्या कुटुंबालाही ट्रोल केले जात आहे आणि आम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. मी कोणतीही गोष्ट अजून बोलले नाही आणि या प्रकरणात मी असे करणे टाळत राहणार आहे. कारण हे सगळे न्यायालयीन आहे. त्यामुळे माझे नाव घेऊन कोणतीही खोटी आणि चुकीची विधाने पसरवू नका,' असे शिल्पाने म्हटले आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पोस्टचा पहिला भाग.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पोस्टचा पहिला भाग.

अर्धवट माहितीवर टिप्पणी करू नका
ती पुढे म्हणाली, 'एक सेलिब्रिटी म्हणून कधीही कोणत्या गोष्टीची तक्रार करु नका, कधीही कोणाला समजावून सांगू नका, या तत्त्वज्ञानाचे मी पालन करते. मी एवढेच सांगने की, आता तपास चालू आहे. माझा मुंबई पोलिस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कुटुंब म्हणून मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते, विशेषतः एक आई म्हणून माझ्या मुलांसाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. सोबतच मी तुम्हाला आणखी एक विनंती करतो की, सत्य जाणून घेतल्याशिवाय त्यावर टिप्पणी करु नका.'

सोबतच शिल्पा पुढे म्हणाली की, लोकांनी आजवर माझ्यावर विश्वास ठेवला असून मी कोणालाही निराश केलेले नाही. माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रायव्हसीच्या अधिकारांचा यावेळी आदर करा. आम्ही मीडिया ट्रायलचे पात्र नाही, असे म्हणत तिने शेवट सत्यमेव जयते म्हटले आहे.

पोस्टमध्ये शिल्पाने माध्यमांना तिच्या मुलांबद्दल अहवाल देऊ नये असे आवाहन केले आहे.
पोस्टमध्ये शिल्पाने माध्यमांना तिच्या मुलांबद्दल अहवाल देऊ नये असे आवाहन केले आहे.

शिल्पाने 25 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता

यापूर्वी, शिल्पाने या प्रकरणाच्या मीडिया रिपोर्टिंगविरोधात उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. तिने 29 मीडिया हाऊसेस आणि पत्रकारांवर खोट्या बातम्या प्रकाशित आणि प्रसारित केल्याचा आरोप करत 25 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र, शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान शिल्पाला कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही आणि न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले होते की, सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांमुळे मानहानी होत नाही.

बातम्या आणखी आहेत...