आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'डर्टी पिक्चर'चा खेळ:अभिनेत्री शिल्पा शेट्टीची पुन्हा होणार चौकशी, PNB च्या बँक खात्यावर क्राइम ब्रँचची नजर; कुंद्राच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज होऊ शकते सुनावणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी 23 जुलै रोजी शिल्पाची चौकशी करण्यात आली होती.

अश्लील चित्रपटांच्या प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. कुंद्राने त्याची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत जामिनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, मुंबई पोलिस पुन्हा एकदा त्याच्या कंपनीत भागीदार असलेल्या शिल्पाची चौकशी करू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. आज पुन्हा शिल्पाला चौकशीसाठी समन्स दिले जाऊ शकते. यापूर्वी 23 जुलै रोजी तिची चौकशी करण्यात आली होती.

शिल्पा मनी ट्रेलच्या अनेक गोष्टी लपवत असल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. कुंद्राचा काळा पैसा लपवण्यासाठी शिल्पाने तिच्या स्टारडमचा वापर केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. मनी ट्रेलसंदर्भातील काही महत्त्वाची कागदपत्रे गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागली आहेत. याच प्रकरणात शिल्पाची पुन्हा चौकशी केली जाईल. आधीच्या छाप्यात गुन्हे शाखेने क्लोनिंगसाठी शिल्पा शेट्टीचा लॅपटॉप, आयपॅड आणि फोन जप्त केले होते. त्याला अहमदाबाद फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. पुढील एक ते दोन दिवसात त्याचा अहवाल येऊ शकतो.

शिल्पाच्या पीएनबी खात्यावर गुन्हे शाखेला संशय
तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या जॉईंट खात्याबद्दल माहिती मिळाली आहे. पंजाब नॅशनल बँकेत उघडलेल्या या खात्यात एका वर्षात कित्येक कोटींचे व्यवहार झाले आहेत. Hotshots App आणि Bolly Fame App मधून झालेली कमाई या खात्यावर येत असल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.

हे प्रत्यक्ष व्यवहार नव्हते, तर वेगवेगळ्या माध्यमांतून छोट्या-छोट्या प्रमाणात पैसे हस्तांतरित करण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तांत्रिक भाषेत त्याला प्लेसमेंट, लेअरिंग, इंटिग्रेशनची मोडस ऑपरेंडी म्हणतात. 23 जुलैला जेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला तेव्हा देखील याविषयी तिची चौकशी केली गेली.

राज कुंद्राच्या वकिलांनी त्याची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले
राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव म्हणाले की, त्यांच्या क्लायंटला अटक करणे बेकायदेशीर आहे कारण त्यांच्या अॅपवरील कोणत्याही व्हिडिओला अश्लील असे म्हटले जाऊ शकत नाही. ते म्हणाले की राज कुंद्राविरोधात पोलिसांनी 4000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र कलम 67 ए अंतर्गत अश्लील व्हिडिओ बनविला गेला असल्याचे ते कुठेही सिद्ध करू शकत नाहीत. ज्या कलमांखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे, त्यात जामीन मिळतो.

या कलमान्वये कुंद्राला अटक करण्यात आली आहे
आयपीसीच्या कलम 420 (फसवणूक), 34 (सामान्य हेतू), 292, 293 (अश्लीलता पसरवणे) आणि आयटी कायद्याच्या कलमांखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राला 20 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने त्याला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 23 जुलै रोजी कोर्टाने राज कुंद्राच्या पोलिस कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ केली होती.

बातम्या आणखी आहेत...