आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलचा जीव धोक्यात:सागरिका सुमनला जीवे मारण्याची आणि बलात्काराची मिळत आहे धमकी, मुलाखतीत म्हणाली - राजने माझ्याकडे न्यूड ऑडिशनची मागणी केली होती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सागरिका पोलिसांत तक्रार करणार

राज कुंद्रा पॉर्न चित्रपट प्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. मॉडेल आणि अभिनेत्री सागरिका शोना सुमनने या प्रकरणी खुलासा करताना म्हटले की, राज कुंद्राचा पर्दाफाश केल्यानंतर तिला धमक्या मिळत आहेत. सागरिकाने काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. तिने सांगितल्यानुसार, राज कुंद्राने तिच्याकडे न्यूड ऑडिशनची मागणी केली होती. हा खुलासा केल्यापासून आपल्याला जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील मेसेज मिळत असल्याचे सागरिकाने म्हटले आहे.

सागरिकाने सांगितल्यानुसार, राज कुंद्राचे प्रोडक्शन असलेल्या एका वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी उमेश कामत नावाच्या व्यक्तीने गेल्यावर्षी तिच्याकडे संपर्क साधला होता.

जीवे मारण्याची आणि बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत
सागरिकाने सांगितले की, आता तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे आणि अश्लील मेसेज पाठवले जात आहेत. एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सागरिका म्हणाली- मी निराश आणि हताश झाले आहे. वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन मला धमक्या मिळत आहेत. ते लोक मला घाबरवत आहेत. जीवे मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी देत आहेत. हे लोक मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करीत आहेत आणि विचारत आहेत की राज कुंद्राने काय चूक केली आहे?

सागरिका पोलिसांत तक्रार करणार
सागरिकाने पुढे सांगितले की, त्या लोकांचा व्यवसाय बंद झाला म्हणून ते मला धमकावत आहेत. मी त्यांचा हा व्यवसाय बंद केल्याचे मला सांगितले जात आहे. लोक अश्लील चित्रपट पाहतात आणि म्हणूनच आम्ही असे चित्रपट बनवतो, असे धमकी देणारे म्हणत आहेत. याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे सागरिकाने सांगितले आहे.

व्हिडिओ कॉलवर न्यूड ऑडिशनची मागणी केली होती
काही दिवसांपूर्वी सागरिकाने एका मुलाखती खुलासा केला होता - 'मी एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. मी इंडस्ट्रीत तीन ते चार वर्षांपासून काम करत आहे. मी जास्त काम केले नाही. लॉकडाऊन दरम्यान घडलेल्या काही गोष्टी आहेत ज्या मला शेअर करायच्या आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये मला कॉल आला, हा कॉल उमेश कामतचा होता. त्यांनी मला राज कुंद्रा निर्मित वेब सीरीजची ऑफर दिली होती. मला सांगण्यात आले की, राज कुंद्रा शिल्पा शेट्टी यांचे पती आहेत.

जेव्हा मला व्हिडिओ कॉल आला, तेव्हा तीन लोक होते. एकाचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नव्हता. ती व्यक्ती कदाचित राज कुंद्रा असावी. व्हिडिओ कॉलवर त्यांनी माझ्याकडे न्यूड ऑडिशनची मागणी केली होती. मी लगेच तो कॉल बंद केला होता.

बातम्या आणखी आहेत...