आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफी प्रकरण:पती राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट, म्हणाली - कठीण काळातही काम केल्याने आपण स्ट्राँग होतो

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी शिल्पाने एक खास नोट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

पोर्नोग्राफी प्रकरणात मागील 19 जुलैपासून तुरुंगात असलेल्या राज कुंद्राला 20 सप्टेंबर रोजी मोठा दिलासा मिळाला. मुंबईच्या सत्र न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचल्यावर त्याला जामिन मंजुर केला. दरम्यान मागील दोन महिने शिल्पा आणि तिच्या कुटुंबासाठी अतिशय कठीण होते. आता ती या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय. शुक्रवारी शिल्पाने एक खास नोट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कठीण काळातही काम केल्याने आपण स्ट्राँग होतो
शिल्पाने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर पुस्तकातील एका पानाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ती या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगताना दिसली आहे. शिल्पाने नोटमध्ये लिहिले, 'असे म्हटले जाते की तुमचा कठीण काळच तुम्हाला स्ट्राँग बनवतो आणि आपण अडचणीतूनच शिकतो. हे खरे असू शकते मात्र कठीण काळ आपल्याला नाही तर कठीण काळातही काम केल्याने आपण स्ट्राँग होतो. दु:खात आपल्याकडे असलेल्या शक्तींची जाणीव होते आणि हा कठीण काळ पुन्हा आला तर आपण याचा सामना करू शकतो.'

एका वादळानंतरदेखील चांगल्या गोष्टी होऊ शकतात
शिल्पा शेट्टीने राज कुंद्राला जामिन मंजुर झाल्यानंतर सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली होती. तिने लिहिले होते, ‘एका मोठ्या वादळानंतरच सुंदर इंद्रधनुष्य दिसते. हे इंद्रधनुष्य वादळानंतरदेखील अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे सांगते.’ या पोस्टसह शिल्पाने इंद्रधनुष्य असलेला फोटो शेअर केला होता. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने काही काळासाठी सोशल मीडियावर ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती सोशल मीडियावर परतली आणि सातत्याने सकारात्मक पोस्ट ती शेअर करतेय.

राज-शिल्पाच्या मुलानेही केली होती पोस्ट
राज कुंद्राला जामिन मिळाल्यानंतर त्याचा मुलगा विआनने सोशल मीडिया अकाउंटवरुन एक खास पोस्ट शेअर केली होती. विआनने त्याची आई शिल्पा आणि धाकटी बहीण समिशासोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत विआनने लिहिले, 'आयुष्य हे गणपती बाप्पाच्या सोंडेप्रमाणे आहे... आयुष्यात येणारी संकटे ही त्याचे वाहन असलेल्या उंदरा प्रमाणे छोटी आहेत. प्रत्येक क्षण हा त्यांच्या मोदकाप्रमाणे गोड आहे... गणपती बाप्पा मोरया...'

पोर्नोग्राफी प्रकरणात मागील 19 जुलैपासून तुरुंगात असलेल्या राज कुंद्राला 20 सप्टेंबर रोजी मोठा दिलासा मिळाला. मुंबईतील मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर राज कुंद्राला जामिन मंजूर केला. दरम्यान जामिन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, राज कुंद्रा स्थानिक पोलिस ठाण्याला कळवल्याशिवाय शहर सोडू शकत नाही. तुरुंगातून बाहेर पडतानाची राजची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यात त्याच्या डोळ्यात पाणी आणि चेह-यावर निराशा दिसली होती.

आरोपपत्रात शिल्पा शेट्टीचा जबाब समाविष्ट

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अटक झाल्यानंतर त्याला प्रथम 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली, स्थानिक न्यायालयाने नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. यानंतर सत्र न्यायालयाने कुंद्राचा जामिन अर्ज फेटाळला होता. राज कुंद्रावर शर्लिन चोप्रापासून पूनम पांडेपर्यंत अनेकांनी गंभीर आरोप लावले होते. हे प्रकरण मुंबई सायबर पोलिसांकडे 2020 मध्ये नोंदवण्यात आले होते.

राज कुंद्रासह त्याचा आयटी प्रमुख रायन थार्प याचीदेखील जामिन याचिका मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने जामिन अर्जावर मुंबई पोलिसांकडून उत्तरही मागितले होते. या प्रकरणात कुंद्रासह 11 आरोपींविरोधात 1500 पानी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रासह 43 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत.

शिल्पा शेट्टीने नोंदवला होता जबाब

शिल्पाच्या साक्षीनुसार, राज कुंद्रा यांने 2015 मध्ये 'विआन इंडस्ट्रीज लिमिटेड’ नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे 24.50 टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल 2015 ते जुलै 2020 या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे साक्षीत सांगितले. हॉटशॉट अ‍ॅप व बॉली फेम या संदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा काय करतो त्यांना माहिती नसल्याचे शिल्पाने जबाबात सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...