आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Raj Kundra Pornography Case: Crime Branch Found Hidden Cupboard In Kundra's Viaan And JL Stream Office In Andheri; News And Live Updates

पॉर्न फिल्म प्रकरण:राज कुंद्राच्या अंधेरी कार्यालयात सापडली रहस्यमय भिंत; एका भिंतीतील कपाटात ठेवले होते यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे कागदपत्रे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 121 इरॉटिक व्हिडिओची करायची होती विक्री

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला मुंबई क्राईम ब्रँचने पॉर्न फिल्म प्रकरणी अटक केली आहे. उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांचे अनेक कारनामे समोर येत आहे. मुंबई पोलिसांना आता राज कुंद्राच्या अंधेरीतील कार्यालयात एक रहस्यमय भिंत आढळली आहे. ज्यामध्ये या पॉर्न फिल्म प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि क्रिप्टोकरन्सीसंबंधित काही अन्य माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी या अंधेरीतील कार्यालयात छापेमारी केली होती. ज्यामध्ये पोलिसांनी ही कागदपत्रे जप्त केली आहेत.

अशातच, कुंद्राच्या कार्यालयातील 4 कर्मचारी या प्रकरणात त्याच्याविरूद्ध सरकारी साक्षीदार होण्यास तयार आहे. त्यामुळे कुंद्रा यांच्या अडचणीत अजून जास्त वाढ होऊ शकते. मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटचे काम कसे चालते याबाबत या कर्मचार्‍यांनी प्रॉपर्टी सेलला सांगितले आहे.

अंधेरी पश्चिम येथील या इमारतीत राज कुंद्रा यांचे कार्यालय सापडले आहे.
अंधेरी पश्चिम येथील या इमारतीत राज कुंद्रा यांचे कार्यालय सापडले आहे.

काळ्या पैशाची रहस्ये भिंतीत लपवून ठेवले होते
मु्ंबई गुन्हे शाखेने यापूर्वी 19 जुलै रोजी याच कार्यालयावर छापा टाकला होता. परंतु, तेंव्हा गुन्हे शाखेला याबाबत काही माहिती मिळाली नव्हती. परंतु, कार्यालयातील चौकशीदरम्यान एका कर्मचाऱ्याने हे रहस्य सांगितले होते. याबाबत खुद राज कुंद्रा यांनीदेखील काही खुलासा केलेला नाहीये.

121 इरॉटिक व्हिडिओची करायची होती विक्री
तपास अधिका-यांनी वृत्तवाहिनीला सांगितले आहे की, राज कुंद्रा 121 इरॉटिक व्हिडिओची विक्री करण्याचा प्रयत्न करीत होता. यासाठी तो एका मोठ्या डीलबाबत गोष्ट करत होता. या डीलमधून कुंद्राला कोट्यावधी रुपये मिळणार असल्याची चर्चा होती. या प्रकरणी कुंद्राच्या यस बँक आणि युनियन बँक ऑफ अफ्रिका यांच्या बँक खात्यांची चौकशी केली जात आहे. हे प्रकरण पैशाशी संबंधित असल्याने आता ईडीदेखील राज यांच्याविरूद्ध फेमा आणि पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तयारी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...