आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरण:गुन्हे शाखेने गहाना वशिष्ठला चौकशीसाठी बोलावले, अभिनेत्री म्हणाली - मी पोर्न इंडस्ट्रीशी संबंधित सर्व नावे पोलिसांना सांगेन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गहाना वशिष्ठला रविवारी चौकशीसाठी हजर व्हायचे होते, पण ती मुंबईबाहेर असल्याने गैरहजर होती.

राज कुंद्राच्या जुहू बंगला आणि अनेक कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म प्रकरणात चौकशीसाठी तीन जणांना समन्स बजावले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अभिनेत्री गहना वशिष्ठसह तीन जणांना रविवारी चौकाशीसाठी बोलावले होते. या मात्र, गहना मुंबईत नसल्याने ती रविवारी गुन्हे शाखेसमोर हजर होऊ शकली नाही.

दरम्यान, गहनाच्या बाजूने विधान आले आहे की, ती पोर्न इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या सर्व मुलींची आणि लोकांची नावे पोलिसांना सांगण्यास तयार आहे. यापूर्वी गहनाने राज कुंद्राचा बचाव केला होता. राज कुंद्राने कोणालाही पॉर्न फिल्म शूट करण्यास भाग पाडले नाही, पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा खोटे बोलत आहेत, असे ती म्हणाली होती.

'बँक खाते फ्रीज, मुंबईत परतण्यासाठी व्यवस्था करावी लागेल'
गहनाने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला रात्री उशिरा हा मेसेज मिळाला, परंतु कोणताही अधिकृत समन पाठविला गेला नाही. मी मुंबईबाहेर आहे आणि त्वरित तिकीट काढणे शक्य नाही. कोविड 19 प्रोटोकॉलमुळे आरटीपीसीआर चाचणी देखील आवश्यक आहे. माझी बँक खाती फ्रीज केली गेली आहेत, म्हणून मुंबईत येण्यासाठी काही व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. मी गुन्हे शाखेच्या अधिका-यांना भेटून त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे.'

'गंदी बात'मध्ये दिसली होती गहना
32 वर्षीय गहनाचे खरे नाव वंदना तिवारी आहे. तिने भोपाळ येथून रोबोटिक सायन्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'बहनें' या मालिकेत गहना मुख्य भूमिकेत दिसली होती. 2012 मध्ये तिने मिस एशिया बिकिनी स्पर्धा जिंकली होती. याशिवाय गेल्या 6 वर्षांत तिने दक्षिणेतील 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गहना गेल्या वर्षी अल्ट बालाजीच्या 'गंदी बात' आणि उल्लू अॅपच्या शोमध्ये दिसली होती.

कामाचे आमिष दाखवून पॉर्न व्हिडिओ बनविल्याचा आरोप
सहा महिन्यांपूर्वी अश्लील व्हिडिओ बनविण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गहनावर 87 अश्लील व्हिडिओ बनवून ते आपल्या वेबसाइटवर अपलोड केल्याचा आरोप होता. हे व्हिडिओ बघण्यासाठी पेड सब्सक्रिप्शनची गरज असते, ज्याचे शुल्क 2000 रुपये ठेवले गेले आहे. पोलिसांनी सांगितले होते की, गहना स्ट्रगलिंग अभिनेत्रींना कामाचे आमिष दाखवून अश्लील व्हिडिओ शूट करीत असे. कामाच्या मोबदल्यात ती प्रत्येक चित्रपटासाठी 15 ते 20 हजार रुपये द्यायची.

5 महिने तुरूंगात होती गहना
जवळपास पाच महिने तुरुंगात घालविल्यानंतर अखेर दिंडोशी सत्र न्यायालयाने गहनाला जामीन मंजूर केला होता. गहना सध्या देशाबाहेर जाऊ शकत नाही. ती भायखळा कारागृहात होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर गेल्या महिन्यात तिला स्ट्रोक आला होता, त्यानंतर तिला जे जे हॉस्पिटलच्या कार्डियक स्पेशालिटी विभागात दाखल करण्यात आले होते.

असा झाला राज कुंद्राच्या नावाचा खुलासा
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहाना वशिष्ठसह नऊ जणांना अटक केली होती. याप्रकरणी दोन एफआयआर नोंदविण्यात आल्या. कथितरित्या कलाकाराला एका अश्लील चित्रपटात न्यूड सीन शूट करण्यासाठी भाग पाडल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी ही कारवाई केली होती.

त्यावेळी शूट केलेले चित्रपट पेड मोबाइल अप्लिकेशनवर रिलीज होत असल्याचे समोर आले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित उमेश कामत नावाच्या व्यक्तीला अटक केली. कामतच्या अटकेनंतर पोलिसांना मोठी लीड मिळाली आणि अश्लील चित्रपटांच्या या रॅकेटमधील राज कुंद्राचे कनेक्शन समोर आले.

बातम्या आणखी आहेत...