आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Raj Kundra Pornography Case News And Updates: Shilpa Shetty Said Her Husband Is Innocent, The Partner Misused His Name; Don't Know What Hotshot App Does

6 तासांच्या चौकशीत शिल्पाचे खुलासे:अभिनेत्री म्हणाली - पती निर्दोष, पार्टनरने त्याच्या नावाचा गैरवापर केला; हॉटशॉट अ‍ॅपबद्दल काहीच माहित नाही

आशीष राय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पा म्हणाली - हॉटशॉट अ‍ॅप कसे काम करते याची तिला माहिती नाही

राज कुंद्राच्या अश्लील अ‍ॅपसंदर्भात मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलच्या टीमने शुक्रवारी त्याची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी केली. शुक्रवारी सायंकाळपासून सुरु झालेली चौकशी तब्बल सहा तास सुरु होती. दरम्यान, आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने मुंबई पोलिसांकडे कुंद्रा विरोधात दाखल असलेल्या एफआयआरची कॉपी आणि तपासाशी संबंधित इतर काही कागदपत्रांची मागणी केली आहे.

शिल्पा म्हणाली - हॉटशॉट अ‍ॅप कसे काम करते याची तिला माहिती नाही
शिल्पाच्या घरी झालेल्या चौकशीतून नवीन खुलासे झाले आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने चौकशीदरम्यान सांगितले की, तिने वियान कंपनी मागील वर्षीच सोडली होती. पोलिसांना दिलेल्या जबाबात शिल्पाने पुढे सांगितले की, 'हॉटशॉट' अ‍ॅप काय आहे आणि ते कसे कार्य करते याबद्दल तिला माहिती नाही. तिला फक्त एवढेच माहिती होते की, तिच्या पतीची कंपनी वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्म बनवते.

नवरा निर्दोष, पार्टनरने त्याच्या नावाचा गैरवापर केला
शिल्पाने पोलिसांना सांगितले की, इरॉटिक हे पॉर्नपेक्षा वेगळे आहे आणि तिचा नवरा निर्दोष आहे. राज कुंद्राचा बिझनेस पार्टनर आणि मेहुणा प्रदीप बक्षी याने त्याच्या नावाचा गैरवापर केला आहे. खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याच्या प्रश्नावर शिल्पाने तिला याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगितले आहे.

शिल्पाने सांगितले की, मी स्वत: एक अभिनेत्री आहे आणि मी कधीही कोणत्याही मुलीला न्यूड सीन करण्यास भाग पाडू शकत नाही आणि मी कोणालाही तसे करण्यास परवानगी देणार नाही. जर कोणावर दबाव आला असेल तर त्याने त्याच वेळी पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी होती.

मुलींनी पैसे घेण्यावर प्रश्न उपस्थित केला
जर त्या मुलींना कामात अडचणी येत होत्या तर त्यांनी पैसे का घेतले, असा प्रश्न शिल्पाने पोलिसांसमोर उपस्थित केला. तिच्या मते, आम्हाला कोणत्याही कारणाशिवाय जाणूनबुजून या प्रकरणात अडकवले जात आहे. इतकेच नाही तर पैसे उकळण्यासाठी तिच्या नव-याला या प्रकरणात अडकवले गेल्याचे शिल्पाचे म्हणणे आहे.

शिल्पाच्या फोनची क्लोनिंग करणार मुंबई पोलिस
शुक्रवारी झालेल्या छापेमारी दरम्यान मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या घरातून काही हार्ड डिस्क, शिल्पाचा लॅपटॉप, आयपॅड आणि काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस तपासाअंतर्गत शिल्पाच्या फोनची क्लोनिंग करणार आहे. असे म्हटले जात आहे की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये या प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी राज कुंद्राने त्याचा फोन, लॅपटॉप वरून बराच डेटा डिलीट केला होते.

कुंद्रा सट्टेबाजीत सामील असल्याचे पुरावे मिळाले
सूत्रांच्या माहितीनुसार, शिल्पाच्या बँक खात्यात आफ्रिका आणि लंडनमधून मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. ही माहिती प्राप्तिकर विभागापासून लपविण्यात आली होती. कुंद्रा क्रिकेटच्या सट्टेबाजीशी संबंधित असल्याचा पुरावा मिळाला आहे. शिल्पाच्या खात्यात यासंदर्भातील काही पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. सूत्रांनुसार, क्रिकेट बेटिंगदरम्यान अनेकदा शिल्पाच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या मते, शिल्पाला तिच्या नव-याच्या सर्व व्यवसायाविषयी आणि इतर संबंधित गोष्टींची पूर्ण माहिती होती पण आता ती त्याला वाचवण्यासाठी या गोष्टी स्वीकारत नाहीये.

इनपुटः निशात शम्शी

बातम्या आणखी आहेत...