आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉर्न चित्रपट व्यवसायिक राज कुंद्राने 2 वर्षांत त्याच्या अॅपचे वापरकर्ते 3 पट आणि 8 पट नफा वाढवण्याची योजना आखली होती. राज कुंदाने आतापर्यत 119 पॉर्न चित्रपट बनवले असून त्याला हे चित्रपट 8.84 कोटी रुपयांना विकायचे होते. विशेष म्हणजे याप्रकरणी त्याच्या एका अॅपवर बंदीसुद्धा घालण्यात आली होती. परंतु, त्याने आणखी एक अॅप तयार केले.
डिजिटल माध्यमांमधून बेकायदेशीरपणे पैसे कमवण्यासाठी राज कुंद्रा अनेक युक्त्या करत होता. जेव्हा या गोष्टींचा भंडाफोड झाला तेंव्हा त्याने काही डेटा डिलिट करत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुंबई पोलिसांच्या पुरवणी आरोपपत्रात दिलेल्या तपशीलांवरून राजचा डावपेच अयशस्वी झाल्याचे दिसून येते. यामुळे राज कुंद्रा यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस राज कुंद्रापर्यंत कसे पोहोचले?
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
हे काम बेकायदेशीर असून आपण यात अडकू शकतो हे राजला माहित होते. याचाच पुरावा म्हणजे राजने मोठ्या प्रमाणात डेटा डिलिट केला आहे. विशेष म्हणजे 'हॉटशॉट' अॅपवर गुगल प्ले आणि अॅपल स्टोअरने अश्लील सामग्री ठेवल्यामुळे बंदी घातली होती. त्यानंतर राजने 'बोली फेम' या नावाने दुसरे अॅप बनवले होते. राजने आयटी विभागाला 'हॉटशॉट'चा सर्व डेटा डिलीट करण्यास सांगितले होते. गेल्या फेब्रुवारीच्या पोलिस प्रकरणानंतर राजने त्याच्या मोबाइलवरून व्हॉट्सअॅप ग्रुप आणि 'हॉटशॉट' अॅपबद्दलच्या चॅट्सही डिलीट केल्या होत्या. रयान थारपच्या मोबाईलमधूनही डेटा हटवण्यात आला होता.
राज कुंद्रा 19 जुलैपासून तुरुंगात
राज कुंद्राला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याला प्रथम 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, तर फोर्ट कोर्टाने (एस्प्लेनेड कोर्ट) नंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. सत्र न्यायालयाने कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळला. शर्लिन चोप्रापासून पूनम पांडेपर्यंत अनेकांनी राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण मुंबई सायबर पोलिसांकडे 2020 मध्ये नोंदवण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.