आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न फिल्म प्रकरण:राज कुंद्राचे नाव खूप आधीच पुढे आले होते, पुरावे गोळा करायला गुन्हे शाखेला लागले पाच महिने

मनीषा भल्लाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॉडेल्सना एनर्जी ड्रिंक देऊन शूटिंग केले जायचे

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा अश्लील व्हिडिओ प्रकरणात सामील आहे, हे पोलिसांना पाच महिन्यांपूर्वीच समजले होते. परंतु पोलिसांनी सर्वप्रथम राज कुंद्राविरोधात ठोस पुरावे करण्याचे काम केले. या दरम्यान कुंद्राचे नाव वारंवार समोर येत राहिले, परंतु पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी घाई केली नाही.

सोमवारी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राला कोर्टाने 23 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील पैशांच्या व्यवहाराबद्दल पोलिस त्याची अधिक चौकशी करु शकतात. राज आणि इतरांमधील संभाषणांचे रेकॉर्ड्स पोलिसांकडे आधीच हे, परंतु पोलिस राजचा जबाब घेऊ इच्छित आहेत.

मॉडेल्सना एनर्जी ड्रिंक देऊन शूटिंग केले जायचे
21 वर्षीय मॉडेलने पोलिसांना सांगितल्यानुसार, तिला एनर्जी ड्रिंक देण्यात आले होते. नंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यात आले. या माहितीनंतर पोलिसांनी मड आयलॅण्डस्थित बंगल्यावर छापा टाकला. जिथून या पॉर्न रॅकेटचा भांडाफोड झाला.

चौकशीत राज कुंद्राचे नाव समोर आले. काही मॉडेल्सनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राच्या कंपनीचे काम असल्याचे सांगून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता.

पोलिसांनी राजविरूद्ध पुरावे गोळा केले
मालवणी पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ उपनिरीक्षक संदीप गायडे यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात गुन्हे शाखेला या प्रकरणात एक क्लू मिळाला होता. त्या आधारे बंगल्यावर छापा टाकण्यात आला. त्यानंतर अटक केलेल्या काही लोकांनी असा दावा केला की, ते राज कुंद्रासाठी काम करत आहेत.

त्यावेळी आरोपींच्या या जबाबाव्यतिरिक्त पोलिसांकडे अन्य कोणताही पुरावा नव्हता. केवळ या आधारे राज कुंद्रासारख्या सेलिब्रिटी व्यावसायिकाला अटक करणे पोलिसांना योग्य वाटले नाही. त्यावेळी जी काही कारवाई केली गेली, त्यामध्ये राजच्या नावाचा समावेश नव्हता.

वझे प्रकरणामुळे विलंब
या प्रकरणात राज कुंद्राचा सहभाग असल्याचे काही मॉडेल्सनी मीडियात विधान केले होते. तरीही पोलिसांनी स्वत:च्या मार्गाने कारवाई सुरू ठेवली. त्याच वेळी अँटिलीया प्रकरणाचा भांडाफोड झाला होता. ज्यात सचिन वझेचे नाव पुढे आले होते. या प्रकरणामुळे पोलिस कमिश्नरपासून ते अनेक अधिका-यांची बदली करण्यात आली. या सर्वांचा पोर्न प्रकरणाच्या चौकशीवर परिणाम झाला.

त्यावेळी पोलिसांनी 9 आरोपींविरोधात 500 पानी आरोपपत्र दाखल केले होते. नंतर राज कुंद्राविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर त्याला गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलविण्यात आले आणि चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.

मुंबई पोलिस मनी ट्रेलचा शोध घेत आहेत
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितले की, पोर्न व्हिडिओ प्रकरण आता सुरू झाले आहे. राज कुंद्रा आणि अशा अनेक (इतर कंपन्यांचे) लोकांचा देखील या व्यवसायात सहभाग असल्याचा संशय आहे. अश्लील व्हिडिओ बनवून एकाहून अधिक मोबाइल अ‍ॅप कंपन्यांना विकले गेले होते. यामध्ये पैशांचा मोठा व्यवहार झाला आहे. आता मनी ट्रेलशोधून काढण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहे. यामुळे आणखी नावे समोर येण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...