आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनसाइड डिटेल्स:राज-नुसरतच्या 'जनहित में जारी' चित्रपटातून लोकसंख्या स्फोटावर केले जाणार व्यंगात्मक भाष्य

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटात काम करणारे दिग्दर्शक, वेशभुषा डिझायनर आणि संगीतकार सर्वच नवीन

'ड्रीम गर्ल' फेम राज शांडिल्य आता निर्माते बनले आहेत. त्यांच्या बॅनरखाली 'जनहित में जारी' चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. नुकतेच याचे शूटिंग मध्य प्रदेशाच्या चंदेरीमध्ये सुरु झाले. याची कथा राज यांनी स्वतः लिहिली आहे. याचे दिग्दर्शन जय बंटू सिंह करणार आहेत. राज यांनी दिव्य मराठीसोबत खास चर्चा केली. त्यांनी सांगितले, या चित्रपटाच्या माध्यमातून सुमारे अर्धा डझन नवीन चेह-यांना संधी दिली आहे. दिग्दर्शक स्वतः या चित्रपटातून डेब्यू करत आहेत. याशिवाय कॉश्च्युम डिझायनरपासून ते संगीतकार देखील नवीन आहेत. मी फक्त चित्रपटाची कथा लिहिली आहे. 'ड्रीम गर्ल' तर शुद्ध कॉमेडी चित्रपट होता. मात्र आम्ही या चित्रपटात देशाच्या लोकांच्या अडचणी व्यंगात्मक पद्धतीने मांडल्या आहेत.

चंदेरीनंतर झाशी आणि आग्र्यात होणार शूटिंग
चित्रपटाचे शूटिंग आता चंदेरीमध्ये सुरु आहे. त्यानंतर निर्माते झाशी, आग्रा आणि बुंदेलखंडमध्ये शूट करणार आहेत. राज सांगतात, चंदेरीमध्ये आमचे 22 दिवसांचे शेड्युल आहे. आमची कथा छोट्या शहरातील महत्त्वकांक्षी तरुणांच्या इच्छेवर आधारित आहे. मुख्य भुमिकेत नुसरत आहे, जी एक कंडोम विक्रेती आहे. नुसरत या भूमिकेसाठी एकदम फिट होती. तिच्यासोबत आमची केमिस्ट्रीदेखील चांगली आहे. या चित्रपटातून आम्ही लोकांचा अहंकार, आणि आत्मविश्वासाची लढाई सादर करणार आहोत. याशिवाय लोकसंख्या स्फोटावरदेखील एक व्यंगात्मक भाष्य करणार आहोत. याला आपण ह्युमरस कॉमेडी नाट्य चित्रपट म्हणू शकतो. एक संवाद.. 'हमारे देश में वेडिंग प्लानर पर लाखो खर्च होते है, पर फॅमिली प्लानिंग के बारे में कोई नहीं सोचता..'

नुसरतसोबत दिसणार नवोदित अनुद
चित्रपटात नुसरतसोबत न्युकमर अनुद सिंह डाका दिसणार आहे. यापूर्वी तो 'छिछोरे' आणि 'सुपर 30' मध्ये दिसला होता. तो भोपाळचा आहे. या दोघांशिवाय यात टीनू आनंद, बृजेंद्र काला आणि विजय राजदेखील मुख्य भूमिकेत आहेत. विजय राजच्या भूमिकेसाठी अन्नू कपूर यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडे तारखा नव्हत्या. ते 'खुदा हाफिज 2' च्या शूटिंगमध्ये सध्या बिझी आहेत. या चित्रपटात कॉमेडियन परितोप त्रिपाठीदेखील आहे.

यानंतर सोनू सूदच्या चित्रपटावर काम सुरु होणार
या मुलाखतीत राज यांनी सांगितले, या चित्रपटानंतर ते लवकरच सोनू सूदसोबत 'किसान' चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहेत. त्यात सध्याच्या शेतकरी आंदोलनाची कथा असेल किंवा नाही, याविषयी सांगणे मात्र त्यांनी टाळले आहे.

बातम्या आणखी आहेत...