आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवसांपूर्वी एका महिला मॉडेलने हॉटेलच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले होते. या प्रकरणात आता पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या मॉडेलला राजस्थानच्या एका मंत्र्यासोबत हनीट्रॅप प्रकरणात अडकवण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी, पप्पा मी आत्महत्या करायला चालले. असे म्हणत राजस्थानमध्ये एका मॉडेलने आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले होते. राजस्थानच्या जोधपुर येथील गुनगुन उपाध्याय या मॉडेलने रातानाडा हॉटेलवरुन उडी मारत आत्महत्येचे पाऊल उचलले होते. आत्महत्या करण्यापूर्वी या मॉडेलने आपल्या वडिलांना फोन केला होता.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात दीपिका आणि अक्षत या दोघांना अटक करण्यात आली असून, या दोघांनी मॉडेलचे काही व्हिडिओ तयार करुन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. मॉडेलच्या माध्यमातून दीपिका आणि अक्षत मंत्री रामलाल जाट यांना फसवण्याची योजना आखत होते. त्यांनी गुनगुनचे व्हिडिओ तयार करत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केले आणि मंत्री रामलाल सोबत संबंध बनवण्यास टॉर्चर केले. या जाचाला कंटाळून गुनगुनने आत्महत्येचे पाऊल उचलले होते.
म्हणून आत्महत्येचे प्रयत्न
व्हिडिओ तयार करुन आरोपी दीपिका आणि अक्षत गुनगुनवर दबाव आणण्याचे प्रयत्न करत होते. मात्र गुनगुनच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने याचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. जाळाला कंटाळून गुनगुनने आत्महत्येचे पाऊल उचलले होते.
आरोपी दीपिका आणि अक्षत यांनी मंत्र्याची भेट घेतली होती
पोलिसांनी सांगितले की, दीपिका आणि अक्षत यांनी मंत्री रामलाल जाट यांची भीलवाडा येथील सर्किट हाऊसमध्ये भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी दोन मुलीही होत्या. मात्र त्यावेळी काही समस्यांबाबत चर्चा झाली होती. यावेळी आरोपींनी मंत्र्यांना काही कागदपत्रेही दाखवली, मात्र ही बाब आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील आहे. हे काम मी करू शकत नाही. असे मंत्र्याने सांगितले. त्यानंतर कामे मार्गी लागावीत म्हणून मंत्र्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा डाव आरोपींनी केला होता.
अंघोळ करताना काढले व्हिडिओ
गुनगुनच्या काही नातेवाईकांनी सांगितले की, काही जणांनी गुनगुनचे अंघोळ करतानाचे काही व्हिडिओ काढले होते. व्हिडिओ काढल्यानंतर गुनगुनला आरोपींनी मंत्र्यासोबत संबंध करण्यास दबाव टाकला. या प्रकरणी पोलिसांनी गुनगुनची सुमारे दीड तास चौकशी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.