आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लुटेरे'चा टिझर रिलीज:समुद्री चाच्यांच्या दहशतीवर आधारित आहे सिरीज, हंसल मेहतांचा मुलगा करतोय दिग्दर्शनात पदार्पण

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध चित्रपट निर्माता हंसल मेहता यांच्या 'लुटेरे' वेब सिरीजचा टिझर रिलीज झाला आहे. लोभ आणि भीती दाखवणाऱ्या या वेब सिरीजची कथा समुद्रात लुटालूट करणा-या लुटारुंवर आधारित असून यात विवेक गोंबर, दीपक तिजोरी, रजत कपूर, चंदन आणि अमृत खानविलकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हंसल मेहता यांचा मुलगा जय मेहता या वेब सिरीजद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हंसल मेहता यांनी शेअर केला टिझर
हंसल मेहता यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर सिरीजचा टिझर शेअर केला आहे. यासोबतच जय मेहताच्या दिग्दर्शनात बनवलेला लुटेरे सादर करताना मला अभिमान वाटतो, असे कॅप्शन त्यांनी लिहिले आहे.

प्रेक्षकांना आवडला टिझर
टीझरच्या सुरुवातीला रजत कपूरला दुर्बिणीसोबत दाखवण्यात आले आहे, ते दूरवरून येणाऱ्या दरोडेखोरांच्या बोटी पाहत आहेत. टिझरमध्ये हंसल मेहताही दिसत आहे. या टिझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सत्य घटनेवर आधारित कथा
'लुटेरे'ची कहाणी ही सत्य घटनांनी प्रेरित एक काल्पनिक थ्रिलर नाटक आहे. सोमालियाच्या किनार्‍याजवळ अपहरण केलेल्या एका मोठ्या व्यावसायिक भारतीय जहाजाची ही कथा आहे. इथूनच त्याची कथा सुरू होते. या थीमभोवती फिरणाऱ्या वेब सिरीजच्या कथेत त्या जहाजावरील ड्रायव्हरचे काय होते हे दाखवले जाईल. या शोचे शूटिंग युक्रेन, केपटाऊन आणि दिल्ली येथे झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...