आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद:अजय देवगणची कार अडवणारा राजदीप सिंगची जामीनावर सुटका, 15 मिनिटे अजयला फिल्म सिटीत जाऊ दिले नव्हेत; वाचा काय आहे प्रकरण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुमारे 15 मिनिटे अडवली होती अजयची कार

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची कार अडवणा-या राजदीप रमेश सिंग नावाच्या तरुणाची जामीनावर सुटका झाली आहे. या वृत्ताला मुंबई पोलिसांनी दुजोरा दिला आहे. राजदीपला भादवी कलम 504 और 506 (ii) अंतर्गत अटक करण्यात आली होती.

सुमारे 15 मिनिटे अडवली होती अजयची कार
ही घटना मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली होती. अजय मुंबईच्या फिल्मसिटीकडे आगामी गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जात असताना राजदीपने त्याची गाडी अडवली आणि त्याला शेतकरी आंदोलनावर भाष्य करायला सांगितले. राजदीप सिंगच्या म्हणण्यानुसार, शेतकरी आंदोलनाला शंभरहून अधिक दिवस झाले तरी अजयने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कोणतंही मत व्यक्त केले नाही म्हणून त्याने अजयची गाडी अडवून विचारण्याचा प्रयत्न केला. राजदीपने 15 ते 20 मिनिटे अजयची गाडी अडवून ठेवल्याचे समोर आले होते. त्याच्यासोबत असलेल्या राजदीपच्या मित्राने सांगितले की, राजदीप फक्त अजयशी शेतकऱ्यांच्या हक्काप्रकरणी बोलण्यासाठी गेला होता.

अजय देवगणचा बॉडीगार्ड प्रदीप इंद्रसेन गौतमने 28 वर्षीय राजदीप सिंगविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजदीप हा मुळचा पंजाबचा आहे.

अजय 'गंगुबाई काठियावाडी'च्या चित्रीकरणात बिझी
‘हम दिल दे चुके सनम’ या सुपरहिट चित्रपटानंतर अजय आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी तब्बल 21 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. अजय देवगणने शनिवारपासून भन्साळींच्या आगामी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. याची माहिती स्वत: अजय देवगणने चाहत्यांसोबत शेअर केली होती. अजय देवगणने सोशल मीडियावर संजय लीला भन्साळींसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, दोन दशकांनंतर संजयच्या सेटवर खूप चांगले वाटत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असून अजय देवगण तिच्या मेंटॉरची भूमिका वठवत आहे. हा चित्रपट यावर्षी 30 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...