आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव कपूर यांचा किस्सा:मंदाकिनीमुळे वडील राज कपूरसोबत नात्यात निर्माण झाला होता दुरावा, राग इतका होता की वडिलांच्या अंत्यसंस्कारातही सामील झाले नव्हते राजीव!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका चित्रपटामुळे राजीव कपूर आणि त्यांचे वडील राज कपूर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

राज कपूर यांचे धाकटे पुत्र आणि ऋषी-रणधीर कपूर यांचे भाऊ राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर याची पुष्टी केली. हृदयविकाराच्या झटक्याने 58 वर्षीय राजीव यांचा मृत्यू झाला आहे. रणधीर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय”, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे.

एका चित्रपटामुळे राजीव कपूर आणि त्यांचे वडील राज कपूर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. तो अखेरपर्यंत कायम राहिला. हा चित्रपट होता राम तेरी गंगा मैली. याचा खुलासा मधू जैन यांनी 'कपूरनामा' या आपल्या पुस्तकात केला आहे.

मंदाकिनीमुळे वडील-मुलाच्या नात्यात निर्माण झाले होते वितुष्ट

मधु जैन यांच्या 'कपूरनामा' या पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार, राजीव कपूर यांनी 1983 साली 'एक जान है हम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पण त्यांच्या करिअरला या चित्रपटाचा फारसा फायदा नाही. त्यामुळे राज कपूर यांनी 1985 मध्ये 'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट बनवून आपला मुलगा राजीवला पुन्हा सिनेसृष्टीत लाँच केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला पण त्याचे श्रेय राजीवला मिळाले नाही, त्याऐवजी चित्रपटाची नायिका मंदाकिनी हिला सर्व श्रेय मिळाले. हा चित्रपट जसाजसा लोकप्रिय होत गेला, तसेतसे राजीव कपूर वडील राज कपूरवर नाराज झाले. या चित्रपटानंतर वडील आणि मुलात वाद निर्माण झाला होता.

'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपटात राज कपूर आणि मंदाकिनी यांच्याच नावाची चर्चा झाली. हा चित्रपट हिट ठरल्याचा राजीव यांना काहीच उपयोग झाला नाही. या चित्रपटाने मंदाकिनीला एका रात्रीतून स्टारपद बहाल केले. मात्र राजीव यांचे करिअर तिथेच थांबले. यासाठी राजीव कपूर यांनी सर्व दोष वडील राज कपूर यांना दिला.

वडील-मुलाने पुन्हा कधीच एकत्र काम केले नाही

'राम तेरी गंगा मैली'नंतर राज कपूर यांनी पुन्हा कधीही राजीवसोबत चित्रपट बनवला नाही. यामुळे राजीव वडिलांवर नाराज राहिले. राजीव यांनी आपल्या छोट्याशा करिअरमध्ये 'लव्हर बॉय', 'हम तो चले परदेस', 'अंगारे', 'थँक यू' यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या, पण ते बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करू शकले नाहीत. असे म्हणतात की, राजीव यांचा आपल्या वडिलांवर एवढा राग होता की, त्यांच्या मृत्यूनंतर ते त्यांच्या अंत्यसंस्काराला गेले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...