आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव मसंद यांना कोरोनाची लागण:चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांची प्रकृती नाजूक, व्हेंटिलेटरवर असल्याचा केला जातोय दावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या आठवड्यात राजीव यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाच्या आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मीडिया रिपोर्टनुसार मसंद यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राजीव यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सुरुवातीला ते घरात क्वारंटाइन होते. मात्र हळूहळू त्यांची प्रकृती खालावत गेली. ऑक्सिजनची पातळी खालावल्यानंतर रविवारी त्यांना तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मित्र म्हणाले - राजीव व्हेंटिलेटरवर नाहीत
राजीव मसंद यांचे निकटवर्तीय सोमेन मिश्रा यांनी सांगितल्यानुसार, राजीव सध्या व्हेंटिलेटरवर नाहीत. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोमेंनी सांगितले की, आता राजीव यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे. आणि लवकरच ते बरे होतील.

करण जोहरच्या कंपनीत सीओओ पदावर आहेत राजीव
'टाइम्स ऑफ इंडिया', 'इंडियन एक्सप्रेस', 'स्टार न्यूज', 'सीएनएन आयबीएन' यासांरख्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांमध्ये 25 वर्षे चित्रपट पत्रकारिता केल्यानंतर राजीव मसंद काही महिन्यापूर्वीच राजीव मसंद हे करण जोहर आणि बंटी सजदेह यांच्या'धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी'मध्ये सीओओ पदावर रुजू झाले होते.

वयाच्या 16 व्या वर्षी पत्रकारितेत आले राजीव
राजीव मसंद यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पत्रकारितेची सुरुवात इंग्लिश वृत्तपत्र 'टाइम्स ऑफ इंडिया'मधून केली होती. त्यांनी काही वर्षे 'इंडियन एक्स्प्रेस'मध्येही चित्रपट पत्रकार म्हणून काम केले होते. यानंतर ते काही वर्षे हिंदी न्यूज चॅनल 'स्टार न्यूज'सह चित्रपट समीक्षक आणि पत्रकार म्हणून जोडले गेले होते. यानंतर राजीव 2005 मध्ये लाँच झालेली 'सीएनएन आयबीएन' या इंग्लिश वृत्तवाहिनीत सहभागी झाले. या वाहिनीवर दर शुक्रवारी चित्रपटांवर आधारित प्रसारित होणारा त्यांचा 'नाऊ शोईंग' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. या वृत्तवाहिनीत त्यांनी सुमारे 15 वर्षे काम केले होते.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात पोलिसांनी केली होती चौकशी
2020 मध्ये सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी तब्बल आठ तास राजीव मसंद यांची चौकशी केली होती. सुशांतविरोधात ब्लाइंड आर्टिकल लिहून त्याला बदनाम केल्याचा आरोप राजीव यांच्यावर होता. सुशांतच्या निधनानंतर एका मुलाखतीत कंगना रनोट हिने करण जोहर, आदित्य चोप्रा, राजीव मसंद आणि महेश भट्ट यांचे नाव गटबाजी करणा-यांमध्ये जोडले होते. या सर्वांची पोलिसांनी चौकशी करायला हवी, अशी मागणी कंगनाने केली होती. इतकेच नाही तर माझा दावा खोटा ठरला तर पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार असल्याचे कंगना म्हणाली होती.

बातम्या आणखी आहेत...