आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील:राजेश खन्ना आणि नवीन निश्चल यांना ऑफर झाला होता 'दीवार', राजेश खन्ना यांनी सोडला चित्रपट आणि अमिताभ झाले सुपरस्टार

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 100 आठवडे ‘दीवार‘ सिनेमागृहात चालला.
 • 01 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करणाऱ्या 70 च्या दशकातील 13 चित्रपटांमध्ये दिवार’चा समावेश.
 • 09 कॅटेगरीसाठी फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळाले होते आणि 7 कॅटेगरीसाठी पुरस्कार मिळाला.
 • 1975 मधील चौथ्या क्रमांकावरील सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट होता ’दीवार’

‘दिवार’ एक मास्टरपीस चित्रपट आहे. ज्याने 7 फिल्मफेअर अवॉर्ड स्वत:च्या नावावर केले. याच चित्रपटामुळे अमिताभ बच्चन यांचे करिअर नावारूपास आले आणि त्यांच्या अँग्री यंग मॅन इमेजला एका उंचीवर नेले. ‘मेरा बाप चोर है..’, ‘उफ..! तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श..’ , ‘कार से आने वाले देर से ही आते है..’ सारखे संवाद चित्रपटाचा आत्मा झाला आणि नंतर याच चित्रपटात भाऊ भावाला म्हणाला... मेरे पास मां है... 

‘दीवार’ चे कथानक दोन भाऊ आणि त्यांच्या आईवर आधारित आहे. कुटुंबावर झालेल्या अत्याचारामुळे त्यांना एका पुलाखाली अत्यंत हलाखीचे आयुष्य जगावे लागते. त्यांचे वडील आनंद वर्मा यांच्यावर मजुरांचा विश्वासघात केल्याचा आरोप करून प्राणघातक हल्ला करण्यात येतोे. हा अपमान त्यांना सहन होत नाही आणि ते आपली पत्नी, मुलांना सोडून निघून जातात. आनंदची पत्नी दोन्ही मुलांसह अत्यंत वाईट दिवस जगत असते. मग तिला हातभार लावावा म्हणून मोठा मुलगा विजय बूट पॉलिश करतो आणि छोटा मुलगा रवी आपले शिक्षण सुरू ठेवतो. मोठे होता होता दोघांचेही मार्ग बदलतात आणि त्यांच्यामध्ये एक न दिसणारी भिंत तयार होते ती दोघांनाही वेगळे करते.

 • ‘मदर इंडिया’ आणि ‘गंगा जमुना’ चित्रपटामुळे मिळाली प्रेरणा

‘दीवार’चे कथानक सलीम-जावेद यांनी ‘गंगा जमुना’ आणि ‘मदर इंडिया’या चित्रपटातून प्रेरणा घेऊन लिहिले होते. त्यांनी या कथानकाला थोडे शहरी स्वरूप दिले आणि नवीन पद्धतीने मांडले. चित्रपटात सलीम-जावेद यांनी विजयचे पात्र नास्तिक दाखवले आहे, परंतु एकीकडे त्याच्या दंडावर मुस्लिम धर्मात लकी मानला जाणारा नंबर 786 चा बॅच बांधलेला असतो. याचे चित्रपटात महत्त्व दाखवले आहे. या चित्रपटानंतर सलीम-जावेद यांच्या जोडीला अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन देऊन बोलावले जाऊ लागले होते. सलीम खान यांनी नंतर ‘नाम’ चित्रपटातही असाच प्रयोग केला. चित्रपटाचा परिणाम आंतराष्ट्रीय चित्रपटावरही झाला. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीने हा फॉर्म्युला बऱ्याचदा आपल्या चित्रपटात वापरला. 1979 मध्ये हाँगकाँगमध्ये प्रदर्शित झालेला ‘द ब्रदर्स’ आणि ‘आतिश चित्रपटदेखील याच प्रेरणेतून तयार झाला आहे.

 • सुपरस्टार राजेश खन्ना यांनी सोडला चित्रपट आणि अमिताभ झाले सुपरस्टार

यश चोपरा दिग्दर्शित आणि सलीम-जावेद यांनी लिहिलेला ‘दीवार’ चित्रपट 45 वर्षांपूर्वी 24 जानेवारी 1975 रोजी प्रदर्शित झाला हाेता. चित्रपटाचे स्क्रिप्टिंग, संवाद, गाणी आणि चित्रीकरणाचे प्रत्येक पैलू इतके उत्कृष्ट होते की हा चित्रपट सुपरहिट होणे त्याच्या नशिबातच लिहिले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांंत जास्त अमिताभ बच्चन यांना लोकप्रियता मिळाली. त्यांची ‘जंजीर’ चित्रपटामुळे अँग्री मॅनची जी प्रतिमा निर्माण झाली होती ती या चित्रपटामुळे अधिक मजबूत झाली. या चित्रपटातील अमिताभ यांचे पात्र हाजी मस्तानच्या व्यक्तिरेखेतून प्रेरित आहे असे म्हटले जाते. या पात्रासाठी यश चोप्रा यांची पहिली पसंती अमिताभ नसून राजेश खन्ना होते. धाकट्या भावाच्या भूमिकेसाठी नवीन निश्चल यांच्याशी संपर्क साधला होता. नंतर त्यांच्या नकारामुळे अमिताभ आणि शशी यांची चित्रपटात एंट्री झाली. खरंतर शशी कपूर अमिताभपेक्षा मोठे असूनही त्यांनी धाकट्या भावाची भूमिका साकारली.

 • 15 टेक मध्ये फायनल झाला ‘आज खुश तो बहुत होगे तुम’...

या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते त्यावेळी अमिताभ ‘शोले’ चित्रपटाचेही चित्रीकरण करत हाेते. दिवसा ते ‘शोले’चे आणि रात्री ‘दीवार’चे िचत्रीकरण करायचे. यासाठी त्यांना मुंबईहून बंगरुळू आणि   बंगरुळहून मुंबईदरम्यान खूप धावपळ करावी लागयची. यादरम्यानच यश चोप्रा यांनी त्यांच्यासोबत ‘कभी-कभी’चे चित्रीकरणही सुरू केले होते. यश यांना भीती वाटत होती की अमिताभ ‘दीवार’ मध्ये ‘कभी-कभी’चे संवाद तर म्हणणार नाहीत ना? परंतु असे काही झाले नाही. ‘आज खुश तो बहुत होंगे तुम....’ हा संवाद म्हणायला अमिताभ यांनी खूप वेळ घेतला. त्यांना हा संवाद देवाशी साधायचा होता आणि हे करताना ते अडखळत होते. हे दृश्य रात्री जवळपास 11 च्या सुमारास सुरू झाले आणि अमिताभ यांनी याचा योग्य शॉट देण्यासाठी 15 टेक घेतले. यादरम्यान केवळ दिग्दर्शक आणि  कॅमेरामॅनच उपस्थित होते.

 • शर्ट लांब असल्यामुळे अमिताभ यांनी मारली होती गाठ

या चित्रपटात अमिताभ यांचा गेटअप डॉकवर काम करणाऱ्या कुलीचा हाेता. चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात त्यांच्या अंगात निळ्या रंगाचा गाठ बांधलेला शर्ट आणि खाकी रंगाची पँट तसेच खांद्यावर दोरी अडकवलेली दिसते. असा गेटअप मजबुरीमुळे करावा लागला होता असे एकदा अमिताभ यांनी स्वत:च सांगितले होते. टेलरने त्यांचा शर्ट इतका लांब शिवला होता की तो गुडघ्यांपर्यंत येत होता म्हणून त्यांनी त्याला गाठ मारली होती आणि हीच त्यांची स्टाइल झाली होती. छातीलादेखील शर्ट जरा सैलच होता आणि त्याला मॅनेज करण्यासाठी खांद्यावर एक दोरी अडकवावी लागली होती.

 • अमिताभ यांनी स्व-संवादाने साकारले मृत्यूचे दृश्य

सलीम-जावेदने चित्रपटाची स्क्रिप्ट अशी लिहिली होती ज्यातून काही काढावे किंवा काही जोडावे अशी कोणतीही शक्यता नव्हती. परंतु, त्या काळात अभिनेत्याला वाटले तर संवादामध्ये बदल करण्यास वाव होता. शेवटच्या दृश्यात एकही संवाद नव्हता ही संपूर्ण स्क्रिप्टमधील त्रुटी होती. ज्या दिवशी दृश्य चित्रीत करण्यात येणार होते त्या दिवशी सर्वांसमोर एकच प्रश्न होता की कोणता संवाद आहे? यश चोपडा यांनी अमिताभ यांना मृत्यूचे दृश्य साकरतवेळी एक सवलत दिली आणि म्हणाले, अमिताभ तू तुझ्या हिशेबाने या दृश्यात संवाद बोल. आणि त्यानंतर जे दृश्य चित्रीत झाले ते चित्रपटाचा आत्माच होऊन गेले.

 • ‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता...’

अमिताभच्या पात्राला खास शैलीतील संवाद आणि अॅक्शन दृश्य दिले गेले होते. त्यांचे पात्र लहानपणी आईला हातभार लावण्यासाठी बूट पॉलिश करायला लागते आणि एक दिवस पॉलिश करण्याचे पैसे घेताना तो शेठला म्हणतो. ‘मैं फेंके हुए पैसे नहीं उठाता..’ 20 वर्षांनंतर हाच शेठ एक दिवस त्याच मुलाकडे पैसे फेकतो तर तो म्हणतो, ‘डाबर साहब मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता.’ यापूर्वी देखील एक दृश्य होते ज्यात डॉकयार्डवर अमिताभ यांचे पात्र जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या वसुलीविरुद्ध आवाज उठवतो आणि म्हणतो, ‘रहीम चाचा, जो 25 बरस में नहीं हुआ वो अब होगा..’ आणि मग ‘तुम मुझे वहां ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूं.... पीटर ये चाबी अपनी जेब में रख लो, अब मैं ये ताला तुम्हारी जेब से चाबी निकालने के बाद ही खोलूंगा’ असे म्हणत 25 गुंडांसोबत एकटाच दोन हात करतो.

 • तू अभी इतना अमीर नहीं हुआ है कि अपनी मां को खरीद सके...

या चित्रपटाचा केंद्रबिंदू आईचे पात्र हाेते. ही भूमिका निरुपा रॉय यांनी साकारली होती आणि यात त्यांना भूमिका मिळण्याची गोष्टही खूप मजेशीर आहे. यश चोप्रा यांना चित्रपटात आईच्या भूमिकेसाठी वैजयंती माला यांना घ्यायचे होते, परंतु वैजयंती माला यांना समजले की, राजेश खन्ना यांनी चित्रपटासाठी नकार दिला तर त्यांनीही नकार दिला. नंतर यश चोप्रा यांनी विचार केला की, वहिदा रहमान यांना घ्यावे. परंतु अमिताभ सोबत वहिदा यांनी ‘कभी-कभी’ चित्रपटात काम केले असल्यामुळे चोप्रा साहेबांनी त्यांनाही घेतले नाही. शेवटी ही भूमिका निरुपा रॉय यांनाच मिळाली आणि चित्रपटाला सर्वांत चांगली आई मिळाली. यासोबतच त्यांचा संवादही अमर झाला...‘विजय… बडा सौदागर बन गया है रे... मगर एक बात बोलूं, अपनी मां को खरीदने की कोशिश मत करना... तू अभी इतना अमीर नहीं हुआ है कि अपनी मां को खरीद सके।’

बातम्या आणखी आहेत...