आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशान खट्टरचे वडील आर्थिक अडचणीत:लॉकडाउन आणि औषधोपचारांवर सेव्हिंगचे पैसे झाले खर्च, पत्नी वंदनाने सांगितले - अजूनही केवळ मेडिकल ट्रीटमेंट सुरु आहेत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याचवर्षी कोरोनामुळे झाले राजेश खट्टर यांच्या वडिलांचे निधन

अभिनेता राजेश खट्टर यांची पत्नी वंदना सजनानीने सांगितल्यानुसार, मागील दोन वर्षांत त्यांचे सेव्हिंगचे सर्व पैसे खर्च झाले आहेत. त्यांचा बहुतांश पैसा केवळ मेडिकल ट्रीटमेंटवर खर्च झाल्याचे वंदनाने सांगितले आहे. मागील वर्षी वंदनाने मुलाला जन्म दिला होता, आणि त्यानंतर ती पोस्टपार्टम (प्रसवोत्तर) नैराश्यात गेली होती. ती सांगते, "गेल्यावर्षी जेव्हा लॉकडाउन पीकवर होते, तेव्हा मला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मला नेमके काय झाले होते? हे खरंच मला माहित नाही. तेव्हापासून आतापर्यंत फक्त हॉस्पिटलाइजेशन सुरू आहे."

सेव्हिंग सर्व खर्च झाले
द क्विंटशी बोलताना वंदना सजनानीने पुढे सांगितले, "गेल्या काही दिवसांपासून हातात काहीच काम नाहीये. जेवढी बचत होती, तेवढी सर्व औषधोपचारांवर खर्च झाली आहे. ही दोन वर्षे लॉकडाउनमध्ये गेली." वंदनाने सांगितले की, त्यांचा मुलगा काही महिने आयसीयूत दाखल होता. आणि तेव्हापासून आतापर्यंतनेिला केवळ एकाच जाहिरातीत काम मिळाले.

याचवर्षी कोरोनामुळे झाले राजेश खट्टर यांच्या वडिलांचे निधन
राजेश खट्टर आणि त्यांच्या वडिलांना यावर्षी कोविड 19 ची लागण झाली होती. आणि दोघेही रुग्णालयात दाखल होते. राजेश कोरोनातून बरे झाले. मात्र त्यांच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका मुलाखतीत राजेश खट्टर यांनी सांगितले होते की, माझ्या परिवारातील एकाला रुग्णालयात बेड हवा होता. मात्र त्याला तो मिळाला नाही. हे सर्व एखाद्या वाईट स्वप्नासारखे होते. त्याला बेड मिळवून देणे ही सर्वात अवघड गोष्ट होती. राजेश यांच्या पत्नीने सांगितले की, राजेश यांच्याजवळ काहीच काम नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या सेव्हिंग्जमधील पैसे वापरावे लागले होते.

जेव्हा वंदनाने केला होता तिला रिप्लेस करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा
फेब्रुवारी महिन्यात वंदनाने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने सांगितले होते की, तिचे सोशल मीडिया फॉलोअर्स कमी असल्याने तिला अनेक शोमधून रिप्लेस करण्यात आले. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर तिला टीव्ही-फिल्म इंडस्ट्रीत कमबॅक करायचे होते. त्यासाठी ती एका कास्टिंग एजंटला भेटली होती. त्याने तिच्याकडे तिचे सोशल मीडिया अकाउंट्सचे डिटेल्स मागितले. काही प्रोजेक्ट्ससाठी तिचे ऑडिशन झाले. आणि तिचे नाव जवळजवळ निश्चित झाले. इतकेच नाही तर शूटिंगची तारीख आणि लोकेशनदेखील तिला सांगण्यात आले. मात्र नंतर तिला कॉल करुन प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आल्याचे कळवण्यात आले.

'दिल धडकने दो' सारख्या चित्रपटात काम केले
वंदनाने 'भीष्मा', 'रिश्ते', 'कॉर्पोरेट', 'दिल धडकने दो' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय ती 'क्या कसूर है अमला का' सारख्या टीव्ही मालिकेतही झळकली. तिने 2008 मध्ये अभिनेता राजेश खट्टरसोबत लग्न केले आणि 2019 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. आयवीएफच्या माध्यमातून वंदनाने मुलाला जन्म दिला. राजेश खट्टर हे अभिनेता ईशान खट्टरचे वडील आणि अभिनेत्री नीलिमा अजीम यांचे पुर्वाश्रमीचे पती आहेत.

बातम्या आणखी आहेत...