आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रजनीकांत यांनी त्यांच्या मालकीच्या असलेल्या मॅरेज हॉलच्या मालमत्ता कराबाबात मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने फटकारल्या नंतर रजनीकांत यांनी आपली चूक कबूल केली आहे. एक ट्विट करुन नेमकी त्यांच्याकडून काय चुक झाली, हे रजनीकांत यांनी सांगितले आहे.
गुरुवारी त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले की, "आम्ही या प्रकरणात मद्रास हायकोर्टाऐवजी चेन्नई कॉर्पोरेशनकडे संपर्क साधायला हवा होता. आम्ही आमची चुक सुधारु आणि त्यातून धडा घेऊ," अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
बुधवारी हायकोर्टाने रजनीकांत यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना म्हटले की, कोर्टाचा वेळ वाया घालवण्याऐवजी त्यांनी चेन्नई कॉर्पोरेशनला एक रिमाइंडर पाठवायला हवे होते.
ராகவேந்திரா மண்டப சொத்து வரி...
— Rajinikanth (@rajinikanth) October 15, 2020
நாம் மாநகராட்சியில் மேல்முறையீடு செய்திருக்க வேண்டும்.
தவறைத் தவிர்த்திருக்கலாம்.#அனுபவமே_பாடம்
नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण?
रजनीकांत यांनी त्यांच्या मालकीच्या असलेल्या मॅरेज हॉलच्या प्रॉपर्टी टॅक्सबाबात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी ग्रेटर चेन्नई महापालिकेच्या मालमत्ता कराच्या मागणीविरोधात याचिका दाखल केली. महापालिकेने त्यांच्या श्रीराघवेंद्र कल्याण मंडपम या मॅरेज हॉलवर 6.5 लाखांचा मालमत्ता कर लावला आहे. रजनीकांत यांनी ही मागणी अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
रजनीकांत यांनी आपल्या याचिकेत म्हटले की, कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे त्यांचा मॅरेज हॉल 24 मार्चपासून बंद आहे. अशा परिस्थितीत जेव्हा उत्पन्नच झाले नाही तेव्हा कर कशाची मागितला जातोय?, असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, महापालिकेने साडे सहा लाख रुपयांचा मालमत्ता कर लावणे चुकीचे आहे. रजनीकांत यांच्या म्हणण्यानुसार, यासंदर्भात त्यांनी महापालिकेकडे अर्जही केला होता, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
रजनीकांत शेवटचे 'दरबार'मध्ये दिसले होते
69 वर्षीय रजनीकांत अखेरचे 'दरबार' या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट यावर्षी 9 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. मात्र त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यांचा आगामी चित्रपट 'अन्नाठे' आहे, ज्याच्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. रजनीकांत यांनी याचवर्षी मार्चमध्ये लवकरच आपला राजकीय पक्ष जाहीर करणार असल्याची घोषणा केली होती. ते असा पक्ष बनवण्याच्या तयारीत आहेत, ज्याचा प्रमुख मुख्यमंत्री होणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.