आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रजनीकांत यांना मिळाला डिस्चार्ज:2 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर रजनीकांत यांना मिळाली रुग्णालयातून सुट्टी, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रजनी यांची प्रकृती स्थिर

रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. रविवारी रुग्णालयाने एक प्रसिद्धीपत्रक जाहिर करुन ही बातमी दिली. डॉक्टरांनी रजनीकांत यांना एक आठवडा बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. 25 सप्टेंबर रोजी रक्तदाबाचा त्रास आणि थकवा जाणवल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रजनी यांची प्रकृती स्थिर

गेले दोन दिवस तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ती पूर्णपणे स्थिर आहे. अपोलो रुग्णालयाने जाहिर केलेल्या निवेदनात सांगितले,'रजनीकांत यांना 25 डिसेंबर 2020 रोजी उच्च रक्तदाब आणि थकवा जाणवल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होती. आता त्यांचे ब्लड प्रेशर स्थिर असून त्यांना बरे वाटत आहे. त्यांच्या प्रकृती झालेली सुधारणा बघता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येतोय.'

रजनीकांत यांचा कोरोना रिपोर्ट आला होता निगेटिव्ह
रजनीकांत यांच्या आगामी ‘अन्नाथे’ या चित्रपटाच्या सेटवर आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रजीनकांतही क्वारंटाइन झाले होते. दरम्यान त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला होता. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

14 डिसेंबर रोजी सुरु झाले होते चित्रीकरण
हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 14 डिसेंबरपासून अन्नाथे या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते. सेटवर क्रू मेंबर्स पॉझिटिव्ह आल्यानंतर आता चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले आहे. या चित्रपटाचे 45 दिवसांचे शूट शेड्युल होते. शूट सुरू होण्यापूर्वी सन पिक्चर्स, प्रॉडक्शन हाऊसने रजनीकांत यांच्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. रजनीकांत यांच्यासह त्यांची मुलगी ऐश्वर्या त्यांच्यासोबत हैदराबादला आली होता. प्रॉडक्शन हाऊसने ऐश्वर्या आणि वडील रजनीकांत यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

पुढील वर्षी येणार रजनीकांत यांचा चित्रपट आणि राजकीय पक्ष
'अन्नाथे' या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह किर्ती सुरेश, मीना, खुशबू, प्रकाश राज आणि सूरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात जॅकी श्रॉफ हे देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. शिवा या चित्रपटाचे दिग्दर्शक असून हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे एप्रिल 2021 मध्ये रिलीज करण्याचे निश्चित करण्यात आले होते. याशिवाय 2021 मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत रजनीकांत आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रजनीकांत यांनी महत्त्वाच्या बैठकीसंदर्भात आपले निवेदन जारी केले होते. यात म्हटले होते की, ‘ते आधी रजनी मक्कल मंद्रमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय घेतील.’ रजनीकांत यांच्या मागील चित्रपटाविषयी बोलायचे झाले म्हणजे, ते 'दरबार' या चित्रपटात शेवटचे दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...