आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सध्या राजकारणापासून दूर राहणार रजनीकांत:रिपोर्ट्समध्ये दावा -  रजनीकांत यांनी प्रकृतीचे कारण देत सध्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रजनीकांत यांनी यावर्षी मार्च महिन्यात घोषणा केली होती की ते पुढील वर्षी पोंगलच्या मुहूर्तावर स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना करतील.
  • दावा केला जातोय की, रजनीकांत यांनी आपल्या सल्लागारांना एक पत्र लिहिले आहे.

सुपरस्टार रजनीकांत सद्यपरिस्थितीत राजकारणात प्रवेश करणार नाहीत. सध्या देशात कोरोना महामारी पसरली आहे आणि स्वतः रजनीकांत यांचीही प्रकृती याकाळात ठिक नाही, ही कारणे यामागे दिली जात आहेत. ही माहिती देताना व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी लिहिले, "आजची सर्वात चर्चेची बातमी. सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या सल्लागारांना एक पत्र लिहून कोरोना आणि त्यांच्या प्रकृतीमुळे ते सध्या राजकारणात प्रवेश करु इच्छित नसल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर पोंगल वर पक्षाची स्थापना करणे सध्या कठीण आहे", असे रजनी यांनी आपल्या सल्लागारांना सांगितल्याचे बाला यांनी लिहिले आहे.

  • रजनीकांत कोरोनाच्या काळात जोखीम घेऊ इच्छित नाहीत

टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या रिपोर्टमध्ये रजनीकांत यांच्या निकटवर्तीयांच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, रजनीकांत आपल्या सल्लागारांना पाठवलेल्या पत्रात स्वतःच्या प्रकृतीचे कारण दिले आहे. सूत्रानुसार, कोरोनाच्या काळात रजनी यांना कोणतीही जोखीम घ्यायची नाही. अमेरिकेत 2016 मध्ये त्यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. जोपर्यंत कोविड -19 ची लस येत नाही, तोपर्यंत राजकारणात प्रवेश न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिल्याचे पत्रात म्हटले गेले आहे.

  • रजनी यांनी लिहिले- मला माझ्या जीवनाची पर्वा नाही

आपल्या पत्रात रजनी यांनी लिहिले की, "मला माझ्या जीवाची काळजी नाही. मला लोकांच्या आरोग्याची चिंता आहे. मी राजकीय बदल घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. मला राजकारणात सक्रिय व्हायचे होते. दरम्यान जर माझी प्रकृती बिघडली तर त्यामुळे राजकीय प्रक्रियेला नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो."

  • चाहते आणि लोकांना विचारले - मी काय करावे हे तुम्हीच ठरवा

रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत यांनी आपला विचार पूर्णपणे सोडलेला नाही. त्यांनी पुढे आपल्या पत्रात लिहिले की, "जर मला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर 15 जानेवारीपूर्वी मी ते लाँच करायला हवे, आणि त्यासाठी डिसेंबरमध्ये माझा निर्णय जाहीर करावा लागेल. त्यामुळे सद्यपरिस्थिती मी काय करायला हवे? याचा निर्णय मी माझ्या चाहत्यांवर आणि जनतेवर सोडतो. जनतेचा निर्णय, देवाचा निर्णय जय हिंद", असे रजनीकांत यांनी पत्रात म्हटले आहे.