आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थलायवाचा अंतिम निर्णय:राजकारणात प्रवेश करणात नाहीत रजनीकांत, चाहत्यांना आवाहन करत म्हणाले - माझ्यावर दबाव आणू नका!

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रजनी यांची ही पोस्ट तामिळ भाषेत आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांनी ते राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. परंतु रजनीकांत यांचे चाहते त्यांना राजकारणात येण्यासाठी दबाव आणत आहेत. म्हणून रजनीकांत यांनी चाहत्यांसाठी सोमवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रजनी यांची ही पोस्ट तामिळ भाषेत आहे.

रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा यासाठी बर्‍याच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता हे सर्व पाहून रजनीकांत यांनी चाहत्यांना आवाहन केले आहे की, अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करून माझ्यावर राजकारणात येण्यासाठी दबाव आणू नये. 70 वर्षीय रजनी यांनी सांगितल्यानुसार, काही चाहत्यांनी चेन्नईत एकत्र येऊन निदर्शने करुन त्यांना त्यांचा राजकारणात प्रवेश न करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती.

डिसेंबर 2020 मध्ये घेतला होता राजकारणात प्रवेश न करण्याचा निर्णय
रजनीकांत यांनी 29 डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे राजकारणात प्रवेश करणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यांनी ट्विटरवरून तीन पानी ट्विट करून राजकारणात प्रवेश करणार नसल्याची घोषणा केली होती. तामिळमध्ये लिहिलेल्या पत्रात रजनीकांत यांनी आपल्या पक्ष प्रवेश न करण्याची कारणं देखील दिली होती.

रजनी यांनी लिहिले होते की, माझी तब्येत खालावली आहे. हा ईश्वराचा सूचक इशाराच मानतो. त्यामुळे मी राजकीय पक्ष स्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लोकांनी त्यांना मी बळीचा बकरा बनवले असे समजू नये, असे रजनीकांत यांनी या पत्रात नमूद केले होते.

डॉक्टरांनी दिला होता रजनीकांत यांना विश्रांतीचा सल्ला
रजनीकांत यांना 25 डिसेंबर 2020 रोजी ताप तसंच श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी रजनी यांना अजून काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. यापूर्वी 3 डिसेंबर रोजी रजनीकांत यांनी 31 डिसेंबर रोजी नवीन पक्षाची घोषणा करुन 2021 मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते.

राजकारणात पाऊल ठेवणारे 8 वे दाक्षिणात्य अभिनेता ठरले असते रजनीकांत
रजनीकांत निवडणुकीत उतरले असते, तर ते राजकारणात प्रवेश करणारे दक्षिणेतील 8 वे कलाकार ठरले असते. डॉ. एमजी रामचंद्रन, एम करुणानिधी, जे जयललिता, कमल हासन, विजयकांत, सैराट कुमार आणि करुणास यांनी अभिनयानंतर राजकारणात पाऊल ठेवले होते.

बातम्या आणखी आहेत...