आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रॉपर्टी टॅक्सविरोधात उच्च न्यायालयात गेले रजनीकांत:मॅरेज हॉलसाठी महापालिकेने भरायला लावला 6.5 लाखांचा कर, सुपरस्टार म्हणाले- कोरोनामुळे कमाईच झाली नाही तर मग टॅक्स कसला?

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रेटर चेन्नई महापालिकेच्या मालमत्ता कराच्या मागणीविरोधात दाखल केली याचिका
  • रजनीकांत यांनी याचिकेत कोरोनाचा संदर्भ दिला आहे

तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या मालकीच्या असलेल्या मॅरेज हॉलच्या प्रॉपर्टी टॅक्सबाबात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी ग्रेटर चेन्नई महापालिकेच्या मालमत्ता कराच्या मागणीविरोधात याचिका दाखल केली आहे. महापालिकेने त्यांच्या श्रीराघवेंद्र कल्याण मंडपम या मॅरेज हॉलवर 6.5 लाखांचा मालमत्ता कर लावला आहे. रजनीकांत यांनी ही मागणी अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

रजनीकांत यांनी दिला कोरोनाचा संदर्भ
रजनीकांत यांनी आपल्या याचिकेत म्हटले की, कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे त्यांचा मॅरेज हॉल 24 मार्चपासून बंद आहे. अशा परिस्थितीत जेव्हा उत्पन्नच झाले नाही तेव्हा कर कशाची मागितला जातोय?, असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, महापालिकेने साडे सहा लाख रुपयांचा मालमत्ता कर लावणे चुकीचे आहे. रजनीकांत यांच्या म्हणण्यानुसार, यासंदर्भात त्यांनी महापालिकेकडे अर्जही केला होता, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

रजनीकांत शेवटचे 'दरबार'मध्ये दिसले होते
69 वर्षीय रजनीकांत अखेरचे 'दरबार' या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट यावर्षी 9 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. मात्र त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यांचा आगामी चित्रपट 'अन्नाठे' आहे, ज्याच्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

रजनीकांत यांनी याचवर्षी मार्चमध्ये लवकरच आपला राजकीय पक्ष जाहीर करणार असल्याची घोषणा केली होती. ते असा पक्ष बनवण्याच्या तयारीत आहेत, ज्याचा प्रमुख मुख्यमंत्री होणार नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser