आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांतची मुलगी सौंदर्याने दिला मुलाला जन्म:सोशल मीडियावर मुलाची झलक दाखवत सांगितले नाव, 2019 मध्ये केले होते दुसरे लग्न

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी आणि चित्रपट निर्माती सौंदर्या रजनीकांतने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. सौंदर्याने ट्विटरवर काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. आपल्या मुलाचे नाव वीर रजनीकांत वनंगमुडी ठेवले असल्याचे तिने सांगितले आहे. सौंदर्याच्या पहिल्या मुलाचे नाव वेद कृष्ण आहे. सौंदर्याचे लग्न विशागन वनंगमुडी या उद्योगपतीशी झाले आहे.

सोशल मीडियावर केली घोषणा
सौंदर्याने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील काही छायाचित्रे पोस्ट करत रविवारी सोशल मीडियावर बाळाच्या आगमनाची गोड बातमी दिली. यासोबतच तिने आपल्या मुलाची एक झलकही शेअर केली आणि लिहिले की, देवाच्या कृपेने आणि आमच्या पालकांच्या आशीर्वादाने, विशगण, वेद आणि मला 11 सप्टेंबर 2022 रोजी वेदचा धाकटा भाऊ वीर रजनीकांतचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. डॉक्टरांच्या टीमचे खूप खूप आभार," असे ती म्हणाली.

सौंदर्याचे विशगनसोबत दुसरे लग्न
सौंदर्या रजनीकांतने फेब्रुवारी 2019 मध्ये अभिनेता आणि उद्योगपती विशगन वनंगमुडीशी लग्न केले. विशगन हा फार्मास्युटिकल कंपनीचा मालक आणि वनंगमुडी व्यावसायिकाचा मुलगा आहे. यापूर्वी सौंदर्या रजनीकांतचे लग्न उद्योगपती अश्विन रामकुमारशी झाले होते, परंतु तिने 2017 मध्ये हे नाते संपुष्टात आणले होते. सात वर्षे सौंदर्याचे पहिले लग्न टिकले होते. पहिल्या लग्नापासून सौंदर्याला वेद नावाचा मुलगा आहे.

मोठा मुलगा वेद कृष्णासोबत सौंदर्या रजनीकांत.
मोठा मुलगा वेद कृष्णासोबत सौंदर्या रजनीकांत.
सौंदर्या रजनीकांत ही एक निर्माती आहे.
सौंदर्या रजनीकांत ही एक निर्माती आहे.

विशगन आणि सौंदर्याचे आहे अरेंज मॅरेज

एका मुलाखतीत विशगनसोबतच्या आपल्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना सौंदर्या रजनीकांत म्हणाली होती, "आमच्या दोघांमध्ये अनेक गोष्टी समान आहेत आणि मला असे वाटते की मी त्याला कायमचे ओळखत आहे. हे एक अरेंज्ड मॅरेज होते. माझ्या वडिलांच्या जवळच्या मित्राने विशगनबद्दल सांगितले होते. त्यावेळी मला कोणतीही कमिटमेंट नको होती, पण जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा मला असे वाटले की तो माझ्यासाठी बनला आहे," असे सौंदर्याने सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...