आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऋषि कपूर आणि रणधीर कपूर यांचे धाकटे बंधू राजीव कपूर यांचे मंगळवारी निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. रिपोर्ट्सनुसार राजीव यांना हार्ट अटॅक आला होता. ज्यानंतर त्यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी तात्काळ त्यांना चेम्पूरच्या इनलाक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्यांनी त्यांना मृत घोषित केले.
मंगळवारी संध्याकाळी राजीव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरने त्यांना मुखाग्नी दिला. राजीव यांना अपत्य नव्हते. ते एकटेच आयुष्य काढत होते. खरेतर राजीव यांचे वैयक्तिक जीवन खूप अस्थिर होते.
2 वर्षे टिकला संसार
राजीव यांनी 2001 मध्ये आर्किटेक्ट आरती सभरवालशी लग्न केले. लग्नानंतर आरती आणि राजीव यांचे जमू शकले नाही. 2003 साली दोन वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर आरती कॅनडाला शिफ्ट झाल्या. तर घटस्फोटानंतर राजीव यांनी पुन्हा लग्न केले नाही आणि अविवाहित राहिले.
राजीव कपूर यांनी 1983 साली 'एक जान है हम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. पण त्यांचे करिअर विशेष उंचीवर गेले नाही. राजीव यांनी 'लवर बॉय', 'हम तो चले परदेस', 'अंगारे', 'शुक्रिया' यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या, मात्र ते बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करू शकले नाहीत.
पद्मिनी कोल्हापुरेंसोबत जोडले नाव
राजीव यांनी प्रेम रोगमध्ये डायरेक्टर राज कपूर यांच्यासोबत असिस्टेंट म्हणून काम केले होते. या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे ऋषी कपूरसोबत प्रमुख भुमिकेत होत्या. चित्रपटाच्या शूटिंदरम्यान राजीव आणि पद्मिनी यांची मैत्री झाली. दोघांनी खूप वेळ एकत्र घालवला.
असे बोलले जाते की, राज कपूर यांना हे आवडले नाही आणि त्यांनी पद्मिनी यांना इशारा दिला की, राजीवपासून दूर राहा किंवा चित्रपट सोडून द्या. पद्मिनी यांनी त्यांचे ऐकले आणि चित्रपटावर लक्ष केंद्रित केले आणि राजीवपासून दूर झाल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.