आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्वर्गीय राजीव कपूर यांच्या कुटुंबाने पुष्टी केली आहे की, कोविड-19 महामारीमुळे त्यांचा चौथा आयोजित केला जाणार नाही. हार्ट अटॅकमुळे 9 फेब्रुवारी रोजी 58 वर्षांच्या राजीव कपूर यांचे निधन झाले होते.
वहिणी नीतू यांनी सोशल मीडियावर केली पोस्ट
राजीव कपूर यांच्या वहिणी नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, 'कोविड-19 महामारीमुळे स्वर्गीय राजीव कपूर यांच्या चौथ्याच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले नाही. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. संपूर्ण राज कपूर कुटुंब तुमच्या दुःखात सामिल आहे.'
तुलसीदास ज्यूनिअरमधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार होते राजीव
राजीव कपूर आपला कमबॅक चित्रपट 'तुलसीदार ज्यूनिअर' रिलीज पाहू शकले नाहीत. त्यांचा चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहे. ते 30 वर्षांनतंर बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी तयार होते. हा चित्रपट मृदुल यांनी लिहिला आणि डायरेक्ट केला आहे. यासोतबच चित्रपटात संजय दत्तही दिसणार आहे. चित्रपट निर्मार्ते आशुतोष गोवारिकर यांनी म्हटले की, त्यांच्या टीमने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच राजीव कपूर यांच्याशी संपर्क साधला होता.
कपूर कुटुंबासोबत अनके इतर स्टार्सही सामिल
राजीव तीन भाऊ (रणधीर कपूर, ऋषी कपूर) आणि दोन बहिणी (रितु नंदा आणि रीमा जैन)मध्ये सर्वात लहान होते. त्यांच्यापेक्षा मोठी बहिण रितु नंदा आणि भाऊ ऋषी कपूर यांचे गेल्यावर्षी जानेवारी आणि एप्रिलमध्ये निधन झालेहोते. महामारी असूनही कपूर कुटुंबाच्या सर्व सदस्यांसह करीना कपूर, करिश्मा कपूर, बबीता, रणबीर कपूर आणि त्याची गर्लफ्रेंड आलिया भट हे राजीव यांच्या अंत्यविधीमध्ये उपस्थित होत्या. हे वृत्त ऐकताच आशुतोष, चंकी पांडे, अनु मलिक, प्रेम चोप्रा आणि अनेक इतर स्टार्सही कपूर निवासात पोहोचले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.