आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजीव खंडेलवालची प्रमुख भूमिका असलेली ‘नक्सलबारी’ ही वेब सीरिज ओटीटी माध्यमावर नुकतीच प्रदर्शित झाली आणि तिला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनीसुद्धा या वेब सीरिजला डोक्यावर घेतले असून अभिनय ते दिग्दर्शन आणि पटकथा ते सादरीकरण या सर्वच अंगांच्या बाबतीत या मालिकेवर स्तुती सुमने उधळली जात आहेत. या मालिकेच्या निर्मात्यांचे त्यांनी निवडलेल्या विषयासाठी तसेच या अत्यंत स्फोटक अशा विषयाला समंजसपणे हाताळल्याबद्दल समीक्षकांनी कौतुक केले आहे.
आतापर्यंत ‘नक्षलबारी’ला 50 दशलक्ष एवढी प्रेक्षकसंख्या प्राप्त झाली आहे. ‘नक्षलबारी’ ही ‘झी5’वर नुकतीच प्रदर्शित झाली असून ती ‘जीसिम्स’ची पहिली निर्मिती आहे.
ही वेब सीरिज निर्मितीच्या सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. कोविड-19 साथरोगाच्या टाळेबंदीमधून थोडीशी सूट सरकारने दिल्यानंतर लगेचच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. संपूर्ण मनोरंजन विश्वाने लॉकडाऊनमुळे कामावर स्थगिती दिली असताना अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जीसिम्स’ने चित्रीकरणाला सुरुवात करायचे ठरवले. ठरल्या वेळेत मालिका प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. या मालिकेचे संपूर्ण चित्रीकरण गोवा येथे ‘एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा’च्या सहकार्याने करण्यात आले आहे.
‘नक्षलबारी’चे दिग्दर्शन दिग्दर्शक पार्थो मित्रा यांनी केले असून या मालिकेत राजीव खंडेलवाल हे मुख्य भूमिकेत आहेत. टीना दत्ता, श्रीजीता डे, शक्ती आनंद, आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा हे इतर आघाडीचे कलाकारसुद्धा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 11 कोटी रुपये या सीरिजच्या निर्मितीवर खर्च करण्यात आले आहेत. ‘जीसिम्स’ लवकरच ‘ बळी '-द व्हीक्टीम’ची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया करत असून त्यात स्वप्निल जोशीची प्रमुख भूमिका आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.