आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा परिणाम:कोविड-19 मुळे बदलली राजीव खंडेलवालच्या 'नक्सल' वेब सीरिजची स्टारकास्ट, नवीन कलाकारांसह लवकरच सुरु होणार चित्रीकरण 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘झी 5’वर ही वेब सीरिज दाखवली जाणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे बराच काळ टीव्ही आणि चित्रपटांचे चित्रीकरण बंद होते. आता अनलॉक 1 नंतर हळूहळू चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. अभिनेता राजीव खंडेलवालची प्रमुख भूमिका असलेल्या 'नक्सल' या नक्षलवादावरील अॅक्शन-थ्रीलर वेब सीरिजच्या चित्रिकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या वेब सीरिजच्या काही भागांचे चित्रीकरण लॉकडाऊनपूर्वी झाले होते. पण आता याच्या स्टारकास्टमध्ये बदल करण्यात आला असून नवीन कलाकारांची एंट्री झाली आहे. कोविड-19 मुळे शोमध्ये काही बदल करण्यात आल्याचे राजीवने एका मुलाखतीत सांगितले आहे.   

‘नक्सल’ या दमदार अॅक्शन-थ्रीलरमधील नवीन कलाकारांची घोषणा करण्यात आली आहे. राजीव खंडेलवाल (राघव), टीना दत्ता (केतकी), आमीर अली (केसवानी), श्रीजीता डे (प्रकृती) आणि सत्यदीप मिश्रा (पहन) हे कलाकार या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. याच्या चित्रिकरणाला निर्माते लवकरच सुरुवात करणार आहेत. त्यासाठी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर योग्य आणि कठोर असे सुरक्षा उपाय योजले जाणार आहेत.

अॅक्शनने भरलेली ही आठ भागांची मालिका काल्पनिक कथेवर अवलंबून असून यात ‘नक्सल’ चळवळीविरोधात लढणाऱ्या एका योद्ध्याची कथा साकारण्यात आली आहे. 

  • ही आहे स्टोरीलाइन

राघवसाठी (राजीव खंडेलवाल) ही काळाच्या विरोधातील लढाई आहे. राघव हा एक पोलीस अधिकारी आहे आणि तो सर्व आव्हानांचा सामना करत लढतो आहे. महाराष्ट्रातील दाट जंगलांपासून महानगरांपर्यंत सर्वच अंगे व्यापणारी अशी ही मालिका असून ‘नक्सल’ चळवळ या दोन्ही वातावरणात कशी फोफावत चालली आहे, त्याचे चित्रण या मालिकेमध्ये घडणार आहे. 

'कोविडच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर बदल केले गेले आहेत. पण सरतेशेवटी यात निवडण्यात आलेले सर्वच कलाकार व तंत्रज्ञ हे खूपच ताकदीचे आहेत. आमीर, सत्यदीप, टीना आणि इतर कलाकारांबरोबर काम करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. त्यांच्यापैकी एकाहीबरोबर मी अद्याप काम केलेले नाही. त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. या मालिकेसाठी आम्ही संहितावाचन केले आहे', असे राजीवने सांगितले. 

तो पुढे म्हणाला, 'या काळात मी माझ्या व्यक्तिरेखेवर काम केले आहे. मला असे वाटते की माझ्या चाहत्यांसाठी ही एक मेजवानी असेल, कारण त्यांनी आत्तापर्यंत मला यासारख्या व्याक्तीरेखेमध्ये कधीही पाहिलेले नाही. ‘एसटीएफ’ एजंटची माझी व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांना चकित करून जाईल. कारण या व्यक्तिरेखेला खूप कंगोरे आहेत. विनोदी अंदाजात सुरुवात होवून ही व्यक्तिरेखा अॅक्शनपर्यंत विविध अंगाने जाते. त्याचवेळी अनेक भावनिक छटाही तिच्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्या संपूर्ण मालिकेत पुढे येतात,' असे राजीव खंडेलवाल म्हणतो.

'नक्सल' या वेब सीरिजची  निर्मिती ‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांनी केली आहे.    

बातम्या आणखी आहेत...