आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटफ्लिक्सचा प्रोजेक्ट:‘मोनिका...ओ माय डार्लिंग’मध्ये दिसणार राजकुमार आणि हुमा कुरेशी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राजकुमार राव आणि हुमा कुरेशी लवकरच एकत्र काम करणार आहेत. दोघे नेटफ्लिक्सच्या ‘मोनिका...ओ माय डार्लिंग’ चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाचे शीर्षक आर.डी. बर्मन यांच्या प्रसिद्ध कॅब्रे साँग ‘मोनिका...ओ माय डार्लिंग’ वरुन घेण्यात आले आहे. हे गाणे हेलन यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. हा चित्रपट ‘मर्द को दर्द नहीं होता’ फेम डायरेक्टर वासन बाला दिग्दर्शित करणार आहेत. मॅचबॉक्स पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत श्रीराम राघवन आणि संजय रौत्रय यांची निर्मिती करणार आहेत.

सध्या तरी चित्रपटाची कथा आणि इतर कलाकारांविषयी काहीच माहिती समोर आली नाही. राजकुमार आणि हुमा यांनी यापूर्वी अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ मध्ये एकत्र काम केले आहे. मात्र दोघांनी चित्रपटात स्क्रीन शेअर केली नव्हती. सध्या चित्रपटाचे प्री प्रॉडक्शनवर काम सुरू आहे. याचे शूटिंग एप्रिलमध्ये सुरू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...