आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता राजकुमार रावची अलीकडेच कुणीतरी फसवणुक केली आहे. स्वतः राजकुमारने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. त्याने सांगितल्यानुसार, त्याच्या पॅनकार्डच्या तपशीलांचा गैरवापर करण्यात आला आहे. राजकुमारनेसांगितले की, त्याच्या पॅनकार्डद्वारे एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या नावावर कर्ज घेतले आहे. त्यामुळे त्याचा सिबिल स्कोअर खराब झाला आहे.
माझ्या पॅन कार्डचा गैरवापर
राजकुमार राव यांनी पोस्ट शेअर करून लिहिले, "#FraudAlert. कोणीतरी माझ्या पॅन कार्डचा गैरवापर केला असून माझ्या नावावर 2,500 रुपयांचे छोटे कर्ज घेतले आहे. त्यामुळे माझ्या CIBIL स्कोअरवर परिणाम झाला आहे." ट्विटमध्ये राजकुमारने क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (CIBIL) अधिका-यांना ट्रग करत, "कृपया यासंबंधी चौकशी करा आणि यापुढे असे काही होणार नाही, याची काळजी घ्या," असे म्हटले आहे.
CIBIL अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद नाही
मात्र, या प्रकरणी सिबिल अधिकाऱ्यांकडून अद्यापपर्यंत अभिनेत्याला कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. राजकुमारची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर कमेंट करत आपले मत मांडत आहेत, तर काहीजण राजकुमारने ही पोस्ट गंमत म्हणून केली की काय, असा प्रश्नही विचारत आहेत.
राजकुमार रावचे आगामी प्रोजेक्ट्स
वर्क फ्रंटवर, राजकुमार लवकरच 'मोनिका, ओह माय डार्लिंग', 'भीड', 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'हिट' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. राजकुमार शेवटचा 11 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या 'बधाई दो'मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासह भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत दिसली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.