आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा 'मोनिका, ओ माय डार्लिंग' हा चित्रपट आज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एक डार्क कॉमेडी असून यात प्रेक्षकांना सस्पेन्स थ्रिलरसह कॉमेडी, क्राईम, ड्रामा पाहायला मिळणार आहे. वासन बाला दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार राव व्यतिरिक्त हुमा कुरेशी आणि राधिका आपटे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दिव्य मराठीने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत-
वासन बाला :- काम करणे खूप सोपे होते, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शूटिंग करताना थोड्या अडचणी आल्या, पण कलाकार खूप छान आहेत, खूप मजा आली.
राधिका आपटे :- मला स्क्रिप्ट खूप आवडली. ही व्यक्तिरेखा खूप आवडली, पण मी जरा नर्व्हस होते, कारण मी याआधी कोणत्याही चित्रपटात कॉमेडी केलेली नाही. माझ्यासाठी ते थोडं आव्हानात्मक होतं.
हुमा कुरेशी :- मी वासनला आधीपासून ओळखते, जेव्हा मी त्याला श्री रामच्या ऑफिसमध्ये भेटले तेव्हा मी त्याला विचारले, 'अरे तू फिल्म बनवत आहेस आणि मला का कास्ट केले नाहीस'. मग त्याने मला फोन करून चित्रपटाची कथा सांगितली, मी म्हणाले, 'ओके डन, कधीपासून सुरु करणार आहोत.'
राजकुमार :- वासनने मला यात खूप मदत केली. चांगला अनुभव राहिला.
राजकुमार राव:- मला वाटते यामागील दोन कारणे आहेत- एक म्हणजे आपण चांगले चित्रपट बनवले नाहीत, खरे सांगायचे तर फार कमी चांगले हिंदी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत आणि दुसरे म्हणजे तिकिटांच्या दरांबाबत निर्णय घ्यायला हवा. थिएटर डेच्या दिवशी 75 रुपयांचे तिकीट होते आणि त्यावेळी सर्व सिनेमे हिट झाले होते, त्यामुळे तिकिटाचे दर कमी कराया हवेत.
हुमा कुरेशी :- जर तुम्हाला थिएटरमध्ये जास्तीत जास्त प्रेक्षक आणायचे असतील तर माझ्या मते तिकिटाची किंमत कमी असली पाहिजे. मध्यमवर्गीय कुटुंबाला मल्टिप्लेक्समध्ये जाणे आता कठीण झाले आहे. जर तुमच्या खिशात 5000 रुपये असतील तर एका छोट्या कुटुंबाला चित्रपटासोबत फक्त पॉपकॉर्न आणि समोसे मिळू शकतात.
राधिका:- कॉमिक टायमिंग सांभाळणे हे अवघड काम आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि हुमा कुरेशी यांच्यासारखे सहकलाकार असल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. राजकुमार आणि हुमा अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत जे फक्त त्यांच्या ओळी बोलत नाहीत तर तुमच्या ओळी देखील ऐकतात आणि तुम्हाला चांगला प्रतिसाद देतात.
हुमा कुरेशी : राजकुमार रावसोबतचा हा माझा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी आमचा 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये फक्त एक सीन होता ज्यामध्ये तो मला 'सलाम भाभी' म्हणत निघून जातो. 'डी-डे' या दुसऱ्या चित्रपटात त्याने माझ्या पतीची भूमिका साकारली होती, पण त्यातही आमचा फक्त एक स्टील फोटो होता. ज्यामध्ये त्याने आवाज दिला होता. अखेर मला या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. राजकुमार लाजाळू नाही, तो खूप बदमाश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.