आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकुमार रावचा 'रूही’ 11 मार्च रोजी चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. हा त्याचा आणि श्रद्धा कपूर अभिनीत 'स्त्री’ प्रमाणेच हॉरर-कॉमेडी जोनरचा सिनेमा आहे. 'स्त्री’मध्ये त्याच्या पात्राचे नाव विकी होते. तर 'रूही’मध्ये राजकुमारच्या पात्राचे नाव भंवरा आहे. दोन्ही पात्रे सारखीच वाटू नयेत अशी राजकुमारला भीती वाटत होती. त्यामुळे त्याने भंवराचा गेटअप थोडा वेगळा केला आहे. राजकुमारसोबत झालेल्या मुलाखतीचा भाग.
याविषयी राजकुमार सांगतो, भंवराच्या पात्रात मी काही बदल केला आहे. केस रंगवले आहेत, ज्याप्रमाणे छोट्या गली-मोहल्ल्यातील आवारा मुले करतात. त्यामुळे मी यात आवारा झालो आहे. खरं तर, ती चीप वाटत होते मात्र तेही त्यांच्या जगात हिट आहे. शिवाय तो 'त’ला 'ट’ म्हणतो. त्याला दुनियादारीची समज नसते मात्र तो स्वत:ला स्मार्ट समजतो. या चित्रपटात देखील 'स्त्री’मधील विकी रिपीट होऊ नये असे मला वाटता होते. त्यामुळे मी आवारा गेटअप स्वीकारला. खरं तर, ते पात्र स्वत:ला खूप समजदार समजतो मात्र जेव्हा तो संकटात सापडतो तो त्याची हीरोगिरी कामी येत नाही. यात त्याची प्रेयसी भूत असते. तेव्हा त्याला काही सूचत नाही.
ही परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे यातील विनोदही थोडा वेगळा असेल. याचे लेखन मृगदीप लांबाने केले आहे. मी त्यांच्या 'फुकरे’ सिरीजचा चाहत आहे. त्यांच्या कथेत परिस्थिती फनी असते. त्या परिस्थिती निघण्यासाठी पात्र जेव्हा रिअॅक्ट होतो तेव्हा त्याला पाहुन हसू येते. अशा प्रकारची काॅमेडी करायला मला आवडते. अशा प्रकार कलाकारांना बळजबरी आणि मोठ्याने बोलावे लागत नाही.
मी ऐकले आहे. बरेच कलाकार चित्रपटागृहात आधी रिलीज करावा, अशा प्रकारचा करार साइन करत आहेत. मात्र मी असे काही केले नाही आणि त्याचा विचारही केला नाही. या सर्व अफवा आहेत. माझ्या मते हा अधिकार निर्माते आणि दिग्दर्शकांना असायला हवा. ओटीटीवर रिलीज करायचा की चित्रपटगृहात, हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असते.
जान्हवीने खूप चांगले काम केले. ती एक सक्षम कलाकार आहे. 'गुंजन सक्सेना’मध्येही तिचे काम आवडले होते. तिच्या प्रत्येक चित्रपटात तिची प्रगती दिसत आहे. शूटिंगच्या आधी आम्ही बरेच वाचन केले होते.
'स्त्री 2’ डेफिनेटली बनणार आहे. मीदेखील ऐकले आहे. त्याच्या प्रीक्वेल प्लान झाले आहे. अमर कौशिकदेखील याविषयी उत्सुक आहेत. आम्ही सर्व त्या जगात जायला तयार आहोत. लवकरच तुम्हाला बातमी कळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.