आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकुमार रावचा पॅटर्न:'या' कारणामुळे राजकुमार रावची गर्लफ्रेंड पत्रलेखा लोकांना सागंते - 'आमचे ब्रेकअप झाले!'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकुमार रावची गर्लफ्रेंड पत्रलेखाने सांगितले - राजला स्क्रिप्ट देण्यासाठी बरेच लोक मला फोन करतात, मी त्यांना सांगते... आमचे ब्रेकअप झाले!

अभिनेता राजकुमार राव अाणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा यांचा ब्रेकअप झाल्याची बातमी अलीकडेच समाेर आली होती. याविषयी जेव्हा ‘दिव्य मराठी’ने पत्रलेखाशी संपर्क केला तेव्हा एक नवीन कहानी समोर आली. याविषयी तिने बरेच काही सांगितले.

पत्रलेखा म्हणाली, ‘खरं तर, बरेच निर्माते आणि फायनान्सर त्यांच्या चित्रपटासाठी राजकुमार रावशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. मात्र यासाठी राजने एक पॅटर्न बनवला आहे. जे त्याला ओळखतात ते त्या पॅटर्नने जात त्याची एजन्सी आणि मॅनेजरशी संपर्क साधतात. ज्यांना हा पॅटर्न माहीत नाही ते माझ्या माध्यमातून राजला नॅरेशन देऊ इच्छित असतात. राजला संपर्क करण्यासाठी मला नेहमी कॉल येत असतात. दर महिन्यांनी हे घडत असते. अशाच एका कॉल दरम्यान मी रागाच्या भरात सांगितले होते, आमचा ब्रेकअप झाला आहे.

एकमेकांच्या कामात लक्ष घालत नाही

तिने पुढे सांगितले, खरं तर, तसे काहीच घडले नाही. आम्ही एकमेकांच्यासोबत आहोत. खुश आहोत. दोघेही आपापल्या कामात व्यग्र असतो. एकमेकांच्या कामाकडे लक्ष देत नाही. तो माझ्या कामाविषयी काही विचारत नाही आणि त्याला त्याच्या कामाविषयी काही विचारत नाही.

आमच्यात अतुट मैत्री आहे

लग्नाच्या प्रश्नावर ती म्हणाली, आम्ही व्यावसायिक कामात व्यग्र आहोत. दोन-तीन वर्षे आम्ही लग्नाचा विचार करणार नाही. वेळ आल्यावर ते कामदेखील आम्ही पार पाडू. पण आधी करिअरवर लक्ष देत आहोत.

बातम्या आणखी आहेत...