आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंच 2:राजकुमार रावने कबूल केले की काही चित्रपट केल्याबद्दल खेद वाटतो, म्हणाला - मी भावूक होऊन ते चित्रपट साइन केले होते

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अलीकडेच राजकुमार रावच्या एपिसोडचा एक टीझर रिलीज करण्यात आला.

अभिनेता राजकुमार राव लवकरच अरबाज खानच्या 'पिंच' या चॅट शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला आहे. या शोमध्ये ट्रोलिंग आणि टीकेवर सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत असतात. अलीकडेच राजकुमार रावच्या एपिसोडचा एक टीझर रिलीज करण्यात आला जो ऑनलाइन शेअर करण्यात आला आहे. शोमध्ये राजकुमार रावने खुलासा केला की, त्याने काही चित्रपट भावूक होऊन साइन केले होते.

चाहत्याने राजकुमारला म्हटले 'हीरो होऊ नकोस'

व्हिडिओत अरबाजने वाचलेली पहिली कमेंट एका चाहत्याची होती, ज्याने राजकुमारला 'सुपर-डुपर अभिनेता' म्हटले आणि त्याला 'हीरो होऊ नको' असा सल्ला दिला. यावर राजकुमार म्हणाला की, लोकांच्या त्याच्याकडूने अपेक्षा आहेत की, त्याने स्टारडमला नव्हे तर परफॉर्मन्सला महत्त्व द्यावे. राजकुमारने त्याच्या अयशस्वी चित्रपटांबद्दल मन मोकळे केले

यावेळी राजकुमारने त्याच्या काही चित्रपटांबद्दल असमाधानी असल्याचे कबूल केले आणि म्हणाला, "एक दोन चित्रपट असे आहेत, जे करुन मनाला समाधान मिळाले नाही. ते चित्रपट केले नसते तरी चालले असते. काही चित्रपट बॉक्स ऑफिससाठी असतात तर काही चित्रपट हे जीवनासाठी असतात," असे तो म्हणाला.

'बधाई दो'मध्ये दिसणार राजकुमार
सोशल मीडियाच्या आगमनापूर्वी आयुष्य खूप शांत होते, असेही राजकुमार म्हणाला. तो लवकरच भूमी पेडणेकरसोबत 'बधाई दो' चित्रपटात दिसणार आहे. हर्षवर्धन कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...